शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

उरी हल्ल्यातील शहिदांना दिव्यांगांची श्रद्धांजली

By admin | Updated: October 19, 2016 01:08 IST

दहशतवाद्यांनी भारतावर केलेला उरी येथील हल्ला हा अतिशय भ्याड आहे, या हल्ल्याचा निषेध करीत असून, आम्ही भारतीय सेनेसोबत आहोत

पुणे : दहशतवाद्यांनी भारतावर केलेला उरी येथील हल्ला हा अतिशय भ्याड आहे, या हल्ल्याचा निषेध करीत असून, आम्ही भारतीय सेनेसोबत आहोत, असे भावोद्गार दिव्यांग व्यक्तींनी मंगळवारी व्यक्त केले. उरी हल्ल्याला मंगळवारी एक महिना झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भारतीय सेनेत कार्यरत असताना अपंगत्व आलेले जवान आणि दिव्यांग व्यक्ती यांनी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौक येथे सायंकाळी ही श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी विविध कारणांनी अपंगत्व आलेले नागरिक आणि भारतीय सेनेच्या गोरखा रायफल रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना अपंगत्व आलेले दोन जवान सहभागी झाले होते. यात नायक सुरेशकुमार कार्की व नायक प्रेमकुमार आले यांचा समावेश होता. दहशतवादाच्या विरोधात सर्व देशांनी एकत्रित यायची आवश्यकता असून, येत्या काळात हे पाऊल उचलायला हवे असेही मत सहभागींनी व्यक्त केले. या वेळी दिव्यांग असलेले दत्तात्रय लखे म्हणाले, भारतीय जवानांनी गोळीला गोळीने उत्तर दिल्याने दहशतवाद्यांची कोंडी झाली आहे. भारताने नुकत्याच केलेल्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वेगळा ठसा निर्माण झाला आहे. यामध्ये जवानांचा मोठा वाटा आहे. या वेळी दिव्यांग नागरिकांबरोबरच आयोजक आकाश कुंभार हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)