ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद मिळालेल्या रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून देवयानी खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. परराष्ट्र सेवेत अधिकारी राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांना तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत भारतीय नोकराचे आर्थिक शोषण आणि व्हिसा घोटाळा प्रकरणात अटक झाली होती.
अमेरिकतील भारताच्या वाणिज्यदूतवासातील उच्च-उपायुक्तपदावर असताना अटक केल्यानंतर त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती.
त्यांना देण्यात आलेल्या वागणुकीचा त्यावेळी सत्तेवर असलेल्या तत्कालिन काँग्रेस सरकार आणि विरोधात असलेल्या भाजप दोघांनीही निषेध केला होता. या प्रकरणामुळे भारत-अमेरिकेतील संबंधही ताणले गेले होते. देवयानी या माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत.