शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांचा ‘कर्नाटक’ बस सेवेस प्रसाद

By admin | Updated: February 11, 2017 00:18 IST

‘एसटी’चे मार्केटिंग कमी पडले : सौंदत्ती यात्रेत ७५ लाखांचा फटका; ३६७ कर्नाटकी बसेसचे बुकिंग

प्रदीप शिंदे---कोल्हापूर --एस. टी.ला तोट्यातून सावरण्यासाठी वरिष्ठ पातळीवर उपाययोजना केल्या जातात. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यावर पाणी पडत असल्याचे चित्र आहे. याचीच प्रचिती सौंदत्ती यात्रेसाठी कमी केलेल्या दराचे कोल्हापूर विभागाने व्यवस्थित मार्केटिंग न केल्याने भाविकांनी ३६७ कर्नाटक बसचे बुकिंग केले. परिणामी राज्य परिवहन महामंडळाला सुमारे ७५ लाखांचा फटका बसला. राज्याच्या खेडोपाडी, डोंगराळ, दुर्गम भागांत एस. टी. आजही तेवढ्याच कार्यक्षमतेने आपली सेवा देत असते. आजही सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे एसटी हेच प्रमुख साधन असल्याने सर्वसामान्यांमध्ये आजही तेवढाच जिव्हाळा आहे. तो जपत असताना एस.टी.चा कारभार तोट्यातूनच चालतो. तो भरून काढण्यासाठी कांही उपाययोजना केल्या जातात मात्र, अधिकारी त्याबाबत सजग नसतील तर त्या योजना फक्त कागदावर राहत असल्याचा अनुभव येतो.कोल्हापूर जिल्ह्णातून माघी सौंदत्ती यात्रेला (पोळ्यांची पौर्णिमा) मोठ्या प्रमाणात भाविक जातात. त्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने कोल्हापूर विभागातील महामंडळाच्या प्रासंगिक करारावर घेतलेल्या एस. टी. गाड्यांचा दर यात्रा कालावधीसाठी कमी केला होता. मात्र ही गोष्ट भाविकांपर्यंत पोहोचविण्यास अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अनेकांनी कर्नाटक एस. टी.ला पसंती दिली. कर्नाटक बसगाड्यांचे दर तेथील प्रशासनाने तत्काळ कमी केले. या गोष्टीचे मार्केटिंग तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन केले.सौंदत्ती यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या प्रासंगिक करारावरील एस.टी.चे दर कमी केले. मात्र, येथील स्थानिक अधिकारी पुरेशी माहिती भाविकांना देत नाहीत. याउलट कर्नाटकातील अधिकारी महाराष्ट्रातून येऊन त्यांच्या बसगाड्यांची माहिती देतात. त्यामुळेच कोल्हापुरातील भाविकांनी कर्नाटकातील गाड्यांचे बुकिंग केले.-अच्युत साळोखे (सरचिटणीस, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना) असा होता दर.....सौंदत्ती यात्रेला जाताना भाविकांना एस.टी.च्या भाडेवाढीसह खोळंबा आकारासंदर्भात काही अडचणी होत्या. त्या मुंबई येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडल्या होत्या. त्यावेळी रावते यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे त्यांनी एस.टी.च्या प्रासंगिक कराराचा दर प्रति किलोमीटर ४२ वरून ३४ रुपये इतका कमी केला. खोळंबा आकार २० टक्क्यांनी कमी करण्याबाबत सूचना दिली. यात्रेसाठी ५५ आसन क्षमतेच्या गाड्या उपलब्ध करून दिल्या.