शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांची दूरदर्शनवर "मन की बात"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 15:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील "मी मुख्यमंत्री बोलतोय" या कार्यक्रमामधून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - "मन की बात" या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेद्रं मोदी भारतातील जनतेसी संवाद साधतत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील "मी मुख्यमंत्री बोलतोय" या कार्यक्रमामधून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. "मन की बात" या कार्यक्रमाच्या संकल्पनेवर मुख्यमंत्र्यांचा विशेष कार्यक्रम आधारित असेल. पंतप्रधान हे रेडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. तर मुख्यमंत्री दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून थेट राज्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.

येत्या रविवारपासून हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. यासाठीचा पायलट एपिसोड नुकताच शूट करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांकडून व्हॉट्स अ‍ॅप आणि ईमेलच्या माध्यमातून प्रश्न मागवण्यात आले होते. व्हॉट्स अ‍ॅपवरून सुमारे 18000 प्रश्न-सूचना आल्या, तर 1250 ई-मेल आले. त्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली. राज्याच्या विविध भागांतून 30 शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी मंत्रालयात बोलावण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु आहेत. याच मुद्द्यावरुन विरोधक आणि शिवसेना भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्नही करत आहेत. दुसरीकडे विरोधकांनी संघर्ष यात्रा काढून सरकारला टार्गेट करण्याचा जोरदार प्रयत्न केलं. काल उत्तर प्रदेशात आदित्यनाथ योगी सरकारने आपल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केलं आहे. युपीतील कर्जमाफीनंर फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशात कर्जमाफी शक्य आहे, महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेबरोबरच विरोधकांनाही पडला आहे.