शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांना लवकर सर्वेक्षण हवे होते; मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:43 IST

माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामागचे कारण त्यांनी राजीनाम्यात लिहिले नसले तरी आयोगावरील दबाव कारण असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आज राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वी सदस्यांचेही राजीनामे पडले आहेत. माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. परंतु, तो ९ डिसेंबरला मंजूर करण्यात आला. यामागचे कारण त्यांनी राजीनाम्यात लिहिले नसले तरी आयोगावरील दबाव कारण असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी सदस्य पदाचा राजीनामा दिलेले सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

संपूर्ण समाज आरक्षणात यायला हवा. तुलनात्मक अभ्यासाच्या आधारावर मराठा समाजाचा प्रश्न सोडविला गेला पाहिजे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा याला आक्षेप होता. गोखले इन्स्टिट्यूटमार्फतच हे काम करायला हवे, असा फडणवीसांचा आग्रह होता, असं किल्लारीकर यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाचे व्यापक स्वरुपात सर्वेक्षण करू नये तर संक्षिप्त स्वरुपात सर्वेक्षण करावे. यामुळे हे सर्वेक्षण लवकर होईल, असं फडणवीसांचं म्हणणं होतं, असं किल्लारीकर यांनी नमूद केलंय. 

एकीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यात मराठा समाजाचे मागासलेले पण सिद्ध करावे लागणार आहे. परंतु मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांपासून सदस्यांचे राजीनामे आल्याने यामागे नेमके काय सुरू आहे असा प्रश्न उभा राहिला आहे. यावर आता आतल्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. 

फडणवीसांच्या या मागणीमागचे राजकारण काय होते हे आम्हाला माहिती नाही. परंतु, संपूर्ण डेटाशिवाय आयोग सर्वेक्षण करू शकत नव्हता. ते आरक्षण कोर्टातही टिकू शकणार नव्हते. आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप होत असल्याने राजीनामा सत्र सुरु झाल्याचा गौप्यस्फोट किल्लारीकर यांनी केला. आयोगाला सरकार गृहीत धरत होते, राजकारण्यांनी मतांसाठी आयोगाचा वापर करून यो, तो त्यासाठी नाहीय, असा सल्ला किल्लारीकर यांनी दिला. 

याचबरोबर किल्लारीकर यांनी निरगुडे यांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला आहे. राज्य शासन आणि संपूर्ण आयोगाची कधीच बैठक झाली नाही. या बैठकींना फक्त अध्यक्ष आणि सचिव जात होते. तेथून आल्यावर सदस्यांसमोर बैठकीत काय घडले ते मांडत होते, यालाही आमचा आक्षेप होता. आयोगाने अशा बैठका करू नयेत. जर गरजच भासली तर सर्व सदस्यांसह राज्य शासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक घ्यावी. अध्यक्षांनी आयोगाला न सांगता परस्पर बैठकांना जाणे आक्षेपार्ह होते. अशामुळे सरकारला सवय लागली आणि त्यांच्या गोष्टी आयोगावर लादल्या जाऊ लागल्या, असा गंभीर आरोप किल्लारीकर यांनी केला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे