शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाला विकास ‘लकवा’

By admin | Updated: April 13, 2015 05:36 IST

मुंबई विद्यापीठाच्या गत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. विविध योजनांसाठी जाहीर केलेला निधी वापरात आला

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. विविध योजनांसाठी जाहीर केलेला निधी वापरात आला नसल्याने विद्यापीठाला विकास लकवा झाला आहे की काय, अशी टीका विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होत आहे.विद्यापीठाने २0१३-१४ या अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी कित्येक कोटींची तरतूद केली होती. मात्र, तरतूद केलेला निधीतील एक रुपयाही आजवर वापरण्यात आला नसल्याने विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे उपकेंद्रासाठी ४ कोटींची तरतूद झाली. मात्र, त्यामधील निधी पूर्ण वापरलेला नाही. विद्यानगरीतील विविध बांधकामांसाठी २८ कोटी ४५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यामधील १0 कोटींचा खर्च झाला आहे. तसेच विद्यापीठाच्या प्रेसमधील मशनरीसाठी २0 लाखांची मात्र त्यामधील एकही रुपया खर्च झाला नसल्याने विद्यापीठ प्रशासनाचा कारभार कुर्मगतीने सुरु असल्याचे दिसत आहे.कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीचे कामही ठप्प झाले आहे. प्रशासनाने कंत्राटदाराचे बिल न दिल्याने त्याने सुरक्षा भिंतीचे काम थांबवले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका विद्यापीठाच्या विकासाला बसत आहे. विद्यापीठ अर्थसंकल्पात तरतूद करते. परंतु तो निधी वापरात येत नसल्याने विद्यापीठाचे नुकसान होत असल्याचे, सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)