शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

गडकिल्ल्यांसोबत जिजाऊसृष्टीचा विकास

By admin | Updated: January 12, 2015 23:30 IST

मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक.

राजेश शेगोकार/बुलडाणाछत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करून आदर्श राज्य पद्धतीचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या आदर्शाचे प्रतीक असलेले गडकिल्ले हे सुरक्षित असावेत, त्यांचे संवर्धन व्हावे, म्हणून लवकरच पुरातत्व विभागासोबत बैठक घेऊन निश्‍चित असे धोरण ठरवू; तसेच जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला आराखडा पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळय़ामध्ये दिली.जिजाऊसृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, युवराज संभाजीराजे भोसले, खा. सुप्रिया सुळे, खा. प्रतापराव जाधव यावेळी प्रामु ख्याने उपस्थित होते.जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा हे देशाचे प्रेरणास्थळ आहे. येथे जिजाऊसृष्टी उभारली जात असून, यासाठी शासनस्तरावर पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा विकास समितीमध्ये या क्षेत्राच्या विकासासाठी २५0 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आराखडा पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने एकनाथ खडसे यांच्याकडे राहणार आहे. या क्षेत्राचा विकास व्हावा व येणार्‍या काळात येथे भव्य स्मारक उभे रहावे, हा शासनाचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. युवराज संभाजी राजे यांनी उपस्थित केलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका दाखवत मुख्यमंत्री म्हणाले की, पुरातत्व विभागासोबत बैठक घेऊन किल्ल्यांच्या संरक्षणाचे धोरण ठरविले जाईल. केंद्राची परवानगी व राज्य सरकारचा निधी यांच्या समन्वयातून हे किल्ले संरक्षित केले जातील, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन लढाईत हे आरक्षण टिकेल, हा सरकारचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट केले. आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे रिक्त पदांची भरती करताना सरकारने जाणीवपूर्वक १६ टक्के जागा रिक्त ठेवल्या आहेत. आरक्षणाची स्थगिती उठताक्षणीच त्या जागा भरल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी काळात एक पर्यटन केंद्र म्हणून बुलडाणा जिल्ह्याचा विकास करू, असे महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ खडसे म्हणाले. *राजकीय टोलेबाजी रंगली खा.प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांच्या आगमनाबाबत समाधान व्यक्त करून, मराठा मुख्यमंत्र्यांनी जिजाऊसृष्टीवर टाळले; मात्र गैरमराठा मुख्यमंत्री येथे आलेत, अशा शब्दात फडणवीस यांचे कौतुक केले. तोच धागा पकडत खा. सुप्रिया सुळे यांनी खासदार जाधवांच्या भाषणावर आक्षेप घेतला. कार्यक्रमात राजकारण आणण्याचा उद्देश नाही; मात्र यापूर्वीचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले नसले, तरी त्यांनी जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी नक्कीच पुढाकार घेतला, अशी आठवण करून दिली. या भाषणानं तर एकनाथ खडसे यांनी युती सरकारच्या काळातच जिजाऊसृष्टीकडे लक्ष देण्यात आले. इतरांनी मात्र पाठ फिरविली, असा टोला हाणला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जे मुख्यमंत्री या ठिकाणी आले नाहीत ते दुर्दैवी होते. मी सुदैवी आहे, अशा शब्दात या टोलेबाजीचा समारोप केला. जिजाऊंचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरूवात केली म्हणून मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मी जिजाऊंचा चरणसेवक म्हणून काम करेन, असेही त्यांनी सांगितले. *जिजाऊसृष्टीसाठी केंद्राकडून मदत - गडकरीछत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांना घडविणार्‍या मातेचे जन्मस्थान विकसित व्हावे, येणार्‍या पिढीला हा इतिहास समजावा, यासाठी येथे उभारण्यात येणार्‍या जिजाऊसृष्टीकरिता केंद्राकडूनही निश्‍चित मदत दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. *जिजाऊसृष्टीसाठी एक कोटीचा निधीजिजाऊसृष्टीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५0 कोटीच्या आराखड्यातील १ कोटी रु पयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देत असल्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.