शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचे भाकीत सोपे, अंमलबजावणी अवघड

By admin | Updated: February 15, 2016 04:09 IST

देशाच्या आर्थिक विकासात आव्हाने आहेत, परंतु त्याने सरकार खचून जाणार नाही. आर्थिक सुधारणांना बळकटी देण्यासाठी नव्या गोष्टी आत्मसात करण्यावर भर दिला जात आहे.

मुंबई : देशाच्या आर्थिक विकासात आव्हाने आहेत, परंतु त्याने सरकार खचून जाणार नाही. आर्थिक सुधारणांना बळकटी देण्यासाठी नव्या गोष्टी आत्मसात करण्यावर भर दिला जात आहे. ‘प्रत्यक्ष कर सुधारणा’ आणि ‘अप्रत्यक्ष कर सुधारणा’ या दोन्ही गोष्टींसाठीची सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. आर्थिक क्षेत्राच्या विकासाबाबत भाकीत करणे सोपे असते. मात्र, त्याची अंमलबजावणी करणे कठीण असते. त्यामुळे केंद्र सरकारचा पायाभूत सेवासुविधा बळकट करण्यावर भर आहे. देशाचा आर्थिक विकास साधताना, रस्ते, विमानतळ आणि रेल्वेसह अन्य क्षेत्रही केंद्रस्थानी आहेत, असे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया’च्या सेंटर एक्स्पोला अरुण जेटली यांनी रविवारी सकाळी भेट दिली. ‘मेक इन इंडिया’चा भाग म्हणून आशिया बिझनेस फोरममध्येही जेटली सहभागी झाले. या वेळी दिलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. मुलाखतीत त्यांनी बॅकिंग, कृषी आणि उद्योग आदी विषयांवर मते मांडली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आर्थिक घडामोडींच्या केंद्रस्थानी यावा, म्हणून अधिकाधिक सुधारणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मेक इन इंडिया’च्या उद्घाटनाच्या वेळी दिले होते. त्यातच आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही केंद्र सरकार लवकरच काही बँकिंग सुधारणांवर भर देणार असल्याची घोषणा या वेळी केली. ते म्हणाले की, ‘मागील तीन दशकांपासून देशाच्या आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. या पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनेही आर्थिक क्षेत्रासाठी मोलाचे योगदान दिले आहे, परंतु असे असले, तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत आल्यापासून, आर्थिक विकासाचे दुसरे पर्व सुरू झाल्याचे जेटली यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)मनमोहन सिंग यांच्यावरही केली टीकाकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग हे जेव्हा देशाचे केंद्रीय अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी देशात आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, जेव्हा ते पंतप्रधान झाले, तेव्हा देशातील आर्थिक सुधारणांना बळकटी मिळण्याऐवजी त्यांचा बट्ट्याबोळ झाला, अशी घणाघाती टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.