शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधी समाजाचे विकासातील योगदान उल्लेखनीय- राज्यपाल

By admin | Updated: April 25, 2016 05:49 IST

नव्या उमेदीने जीवन सुरू करीत सिंधी समाजाने उद्योजकता, कर्तबगारी व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर प्रगती केली

मुंबई : देशाच्या फाळणीमध्ये सर्वस्व गमावूनदेखील महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये नव्या उमेदीने जीवन सुरू करीत सिंधी समाजाने उद्योजकता, कर्तबगारी व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर प्रगती केली, तसेच राज्याच्या व देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदान दिले, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी काढले.भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या मुलुंड येथील गुरु गोविंद सिंह महापालिका मैदानावर आयोजित केलेल्या ‘चेती चाँद मेला’ या सिंधी नववर्ष सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. सिंधी बांधवांनी मुंबईत निर्माण केलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, असे सांगत सिंधी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी गुजरात येथील ‘इन्स्टिट्युट आॅफ सिंधोलॉजी’प्रमाणे मुंबईतदेखील एक उच्चशिक्षण संस्था निर्माण करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. कुलपती या नात्याने अशी संस्था निर्माण करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.भारतीय सिंधू सभेने गैर सिंधी भाषिक विद्यार्थ्यांना सिंधी भाषा शिकण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करावी, अशीही सूचना त्यांनी या वेळी केली. सिंधी समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार सरदार तारासिंह, अखिल भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष लक्ष्मण चांदिरामाणी, कार्याध्यक्ष लधाराम नागवाणी, महासचिव राधाकृष्ण भगिया, महोत्सवाचे सचिव किशोर असवाणी व अनेक सिंधी बांधव उपस्थित होते.