शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विमा उत्पादने विकसित करा

By admin | Updated: August 27, 2015 03:07 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटकाळात शेतकऱ्यांना टिकाव धरता यावा, यासाठी शाश्वत कृषी विमा उत्पादने विकसित करावीत, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद

उपराष्ट्रपतींचे आवाहन : विम्याचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावामुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटकाळात शेतकऱ्यांना टिकाव धरता यावा, यासाठी शाश्वत कृषी विमा उत्पादने विकसित करावीत, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी विमा कंपन्यांना केले. इन्श्युरन्स इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि पुढील हंगामापर्यंत त्यांचा पतदर्जा कायम राहावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि त्याच्या त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या समस्यांचे निवारण करणे गरजेचे आहे. भारतातील कृषी क्षेत्राला दुष्काळ, पूर, पिकाला कीड लागणे आणि पिकांना लागणारे रोग यांचा धोका असतो. पर्जन्यमान मोजमापाच्या अद्ययावत सुविधेच्या मदतीने पर्जन्यमान विमा योजना तयार करून या समस्यांवर काही प्रमाणात मात करता येईल. सार्वजनिक आणि खासगी विमा कंपन्या पर्जन्यमान विमा उत्पादनांसंदर्भातील शक्यता पडताळून पाहात आहेत आणि त्यांच्या प्रतिसाद प्रोत्साहन वाढविणारा आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले. विम्याचा प्रसार तळागाळापर्यंत न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. २०१२-१३ या वर्षासाठी विम्यातून मिळणाऱ्या प्रीमिअमचे प्रमाण जीडीपीच्या ३.९६ टक्के एवढे होते. जगभरात हेच प्रमाण सरासरी ६.३ टक्के एवढे होते, असेही त्यांनी नमूद केले. दक्षिण आफ्रिकेतील अभिनव प्रयोगरवांडा, घाना, सेनेगल इत्यादी आफ्रिकन देशांमध्ये शेतकऱ्यांना पारंपरिक पिकविम्यापेक्षा वातावरणावर आधारित विमा कमी प्रिमीअमध्ये देण्यात येतो. भारतात विम्याचा प्रसार करण्यासाठी या मॉडेलमध्ये भारताच्या दृष्टीने सुधारणा करून ती वापरता येऊ शकतात, असेही अन्सारी म्हणाले.