शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

लोकहितासाठी देवस्थानांनी समोर यावे - सुप्रिया सुळे

By admin | Updated: September 20, 2015 22:55 IST

शेगाव येथील देवस्थान न्यासांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावरील चर्चासत्रात सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.

फहीम देशमुख / शेगाव (जि. बुलडाणा) : राज्यातील देवस्थानांनी शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानप्रमाणे लोकहितासाठी समोर यावे असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी येथे देवस्थान न्यासांची सामाजिक जबाबदारी या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. येथील श्री. संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या स्वाध्याय कक्ष, सर्मथ रामदास स्वामी क्रीडा मंदिरात आयोजीत या चर्चासत्राचे उदघाटन संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सिद्धीविनायक संस्थानचे नरेंद्र राणे, जैन देवस्थानचे सुदर्शन जैन, पीर मगदूम साहेब चॅरिटेबल ट्रस्टचे नूर पारकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अँड. स्मित सरोदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींची उपस्थिती होती. खा. सुप्रीया सुळे पुढे म्हणाल्या की, भविष्यातही प्रतिष्ठानच्यावतीने जागर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मध्यंतरीच्या काळात महिलांसाठीच्या चळवळी कमी पडल्या. मात्र, आता याकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले जाईल. शेगाव संस्थानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. या चर्चासत्रासाठी बीज निबंधाचे सादरीकरण अर्थतज्ज्ञ डॉ. अभय टिळक यांनी केले. उदघाटनपर भाषणात कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या चर्चासत्राची खर्‍या अर्थाने आज गरज असल्याचे सांगितले. अँड. स्मित सरोदे, नूर पारकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक सदा डुंबरे तर संचालन सुधीर भोंगळ यांनी केले. यावेळी श्री. संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्रा. झा यांनी संस्थानच्या कार्याचा आढावा घेतला. चर्चासत्रात माजी जि.प. उपाध्यक्ष पांडूरंग पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, संगीतराव भोंगळ, अँड. नाझेर काझी, बुलडाणा न. प. अध्यक्ष टी.डी.अंभोरे, निलेश राऊत, चेतन पुंडकर, अमीत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

*ही शिस्त पक्षात असती तर ..

खा. सुप्रिया सुळे चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी पोहचल्या. यावेळी सभागृहासमोर अत्यंत व्यवस्थितपणे काढलेले चपला, बुटांचे जोड पाहून त्या मनातल्या मनात हसल्या. त्यानंतर मंचावरुन भाषण देतांना त्यांनी हसण्याचे रहस्य उघड केले. येथील शिस्त आदर्शवत आहे. अशा शिस्तीतूनच विकासाकडे वाटचाल होते. हीच शिस्त जर पक्षात असती तर आज वेगळे दिवस असते असा मार्मिक टोला त्यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना लगावला.