शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानांचे पुन्हा झाले राजकीय वाटप

By admin | Updated: April 27, 2016 06:43 IST

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केलेली असतानाही युती सरकारने देवस्थानचे राजकीय वाटप निश्चित केले आहे.

मुंबई : राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्त पदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केलेली असतानाही युती सरकारने देवस्थानचे राजकीय वाटप निश्चित केले आहे. त्यानुसार शिर्डीचे साईबाबा संस्थान, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर व कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद भाजपाला, तर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक संस्थानचे अध्यक्षपद शिवसेनेला दिले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज लोकमतला ही माहिती दिली. ते म्हणाले, महामंडळाच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात अशी सर्वच मंत्र्यांची भावना असून मुख्यमंत्रीही त्यास अनुकूल आहेत. सूत्रांनी सांगितले की, सिद्धीविनायक संस्थानबरोबरच महालक्ष्मी मंदिर संस्थानचे अध्यक्षपदही शिवसेनेने मागितले होते. तथापि, भाजपाने त्या बाबत असमर्थता दर्शविली. त्याऐवजी सिडको वा म्हाडापैकी एकाचे अध्यक्षपद शिवसेनेला दिले जाऊ शकते. उच्च न्यायालयाने जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील शिर्डी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन मंडळ नेमण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर सरकारने नेमलेल्या नव्या विश्वस्त मंडळातही राजकीय नेत्यांची वर्णी लावण्यात आली. ही बाब याचिकाकर्त्यांने निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने तेही मंडळ बरखास्त केले. हा इतिहास ताजा असताना पुन्हा या देवस्थानांची राजकीय वाटप होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (विशेष प्रतिनिधी)