शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: June 20, 2017 17:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या निर्णयाप्रमाणे

 ऑनलाइन लोकमत चंद्रपूर, दि. 20 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या निर्णयाप्रमाणे सन 2022 पर्यंत महाराष्ट्रातील शेतक-यांचे सुध्दा उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र शासनाच्या तीनवर्ष पूर्ती निमित्त बालाजी सभागृह बल्लारपूर येथे वेस्टर्न कोल फिल्ड लि.च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी बोलतांना व्यक्त केले.
या कार्यक्रमास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार ॲड.संजय धोटे, नगराध्यक्ष हरीष शर्मा, उपाध्यक्षा मीना चौधरी, पोंभूर्णा नगरपंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सभापती अल्लका आत्राम, वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासिंग व खुशाल बोंडे मंचावर उपस्थित होते.
" केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सबका साथ सबका विकास हे धोरण ठरवून आदिवासी, गरीब, किसान व मजूर अशा अंतिम घटकापर्यंत न्‍याय देण्याचा निर्णय घेतला असून, या सर्वांचा विकास होईल, तेव्हाच ख-या अर्थाने देशाचा विकास झाल्याचे दिसून येईल,"  असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. केंद्र शासनाने सर्वांचा विकास साधण्यासाठी तीन वर्षात विविध योजना मंजूर केल्या असून, त्या योजनाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. असे पंतप्रधान मोदी यांचे धोरण असल्यानेच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांना न्याय देण्याचा संकल्प करीत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजनेमधून आतापर्यंत देशातील 2 कोटी गरीब, किसान व मजूर नागरिकांना 100 टक्के सुटीवर गॅसचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  याच योजनेमधून महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली व नंदूरबार जिल्हयातील सर्व समाजाच्या नागरिकांनाही गॅस देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.   
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व भागात व सर्व क्षेत्रात लक्ष ठेवून असून त्यांनी संपूर्ण देशाचा विकास साधण्याचा निर्धार केला आहे.  त्या दृष्टीने त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, स्कील इंडिया, सिंचाई योजना, अमृत योजना, देशाची उत्पादकता वाढविण्यासाठी मेक इन इंडिया इत्यादी प्रकारच्या अनेक विविध लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यांनी सुरु केलेल्या या निर्धारास आपण सर्वांनी साथ दयावी आणि आपला व आपल्या देशाच्या संर्वागीण विकासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहावे,"  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे शेवटी आनंदवन येथील दिव्यांग कलाकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी गीते व नृत्याचे प्रदर्शन केले. यावेळी उज्वला गॅस योजनेतून गॅस कनेक्शनचे वितरणही करण्यात आले तसेच ज्या नागरिकांनी गॅसची सबशिडी सोडली अशा व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.