शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तोतया लष्करी अधिकाऱ्यास अटक

By admin | Updated: October 2, 2016 01:27 IST

कधी कर्नल तर कधी मेजर असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या ठगाला भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सागर मिश्रा असे प्रतापी ठगाचे नाव आहे. त्याच्या उच्च राहणीमानामुळे

मुंबई : कधी कर्नल तर कधी मेजर असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या ठगाला भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सागर मिश्रा असे प्रतापी ठगाचे नाव आहे. त्याच्या उच्च राहणीमानामुळे नागरिक त्याच्या भूलथापांना बळी पडले. मीरा रोड येथील रहिवासी असलेला मिश्रा याने आर्मीचे स्टिकर असलेल्या गाडीचे फोटो ओएलएक्सवर टाकले, हे स्टिकर्स बघून आणि फेसबुकवरील याचे हे सगळे फोटो बघून आपण एखाद्या मेजरकडून गाडी विकत घेत असल्याचा ग्राहकांचा समज व्हायचा. फेसबुकवर त्याने आर्मी युनिफॉर्ममधील फोटोही पोस्ट केले. त्यामुळे लष्करी अधिकारी असल्याने आपली फसवणूक होणार नाही. या विचाराने अनेकांनी त्याच्याशी संपर्क साधून गाडीबाबत व्यवहार केला. व्यवहारानंतर मिश्राने गाडी देण्याबाबत टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. फेब्रुवारीमध्ये भायखळा येथील एहमद हुसेन यांनाही मिश्रा याने पाच लाखांची फसवणूक केली. हुसेन यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. तपास सुरू असताना मिश्रा मीरा रोड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने मिश्राला आॅडी विकत घेण्याच्या बहाण्याने सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीत त्याने आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध मीरा रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या बँक खात्यातही विविध ठिकाणांहून पैसे जमा झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानुसार त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिंगटे यांनी दिली. मिश्राच्या उच्च राहणीमानामुळे अनेक जण त्याच्या भूलथापांना बळी पडत होते. अशा प्रकारे आणखीन कुणाची फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहनही भायखळा पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)