मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतक-यांचे आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्यासाठीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. १ आॅक्टोबर २०१७ पासून कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या कर्ज खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.२२ आॅगस्टपर्यत २२ लाख ४० हजार ९४३ शेतकºयांची नोंदणी झाल्याचे व १८ लाख ८५ हजार ४५७ शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले. मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक मंगळवारी झाली. त्यात आॅनलाइन नोंदणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार आदी उपस्थित होते.ई-सुविधा केंद्रांवरील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही केंद्रांवर शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे आकारण्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत संबंधित ई-सेवा केंद्रांवर कारवाई करावी आणि बंद असलेली केंद्रे तत्काळ सुरू करावीत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले. राज्यातील सर्व संबंधित शेतकºयांनी जवळच्या ई -सुविधा केंद्रांवर जाऊन कर्जमाफीचे अर्ज भरावेत, असे आवाहन सहकार मंत्री देशमुख यांनी या वेळी केले.
आॅनलाइन कर्जमाफी नोंदणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 2:23 AM