शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीने खर्च करूनही सिंचन शून्य

By admin | Updated: April 18, 2016 01:28 IST

गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली

जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली, असा पलटवार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर केला. राज्यात दीड वर्षांत एक टक्काही सिंचन झाले नसल्याची टीका पवार यांनी महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी येथील राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटन समारंभात केली होती. महाजन यांनी रविवारी जामनेरमध्ये पत्रकार परिषदेत पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच युती सरकार सिंचनासाठी कोणत्या योजना अंमलात आणत आहे, याची जंत्रीच तपशीलवारपणे मांडली.आघाडी शासनातील तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल ९० हजार कोटींचे कर्ज काढले. मात्र त्यातून त्यांनी किती व कोणते प्रकल्प पूर्ण केले व किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याचा अद्यापही ताळमेळ लागत नसल्याचे ते म्हणाले. जलसंपदा खात्याने ९७ कामांना मंजुरी देऊन त्यातील २८ प्रकल्प पूर्ण केले. गेल्या वर्षभरातच सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे पवार यांना सिंचनावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)