शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

अध्यक्ष होऊनही शनीचौथरा वर्ज्यच!

By admin | Updated: January 12, 2016 01:58 IST

शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी अनिता चंद्रहास शेटे यांची सोमवारी निवड झाल्याने गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे. तथापि, महिला अध्यक्ष झाली

सोनई (अहमदनगर) : शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी अनिता चंद्रहास शेटे यांची सोमवारी निवड झाल्याने गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे. तथापि, महिला अध्यक्ष झाली, तरी, शनिचा चौथरा महिलांसाठी वर्ज्यच राहणार आहे. आम्ही प्रथा व परंपरांचे काटेकोरपणे पालन करणार असून महिलांना चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेता येणार नाही, असे खुद्द नूतन अध्यक्षांनीच स्पष्ट केले आहे.आदिनाथ शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीनंतर विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष अनिता शेटे यांचा सन्मान करण्यात आला. येथील चौथऱ्यावर शनिदेवाची मूर्ती नसून स्वयंभू शिळा आहे़ त्यामुळे कुणालाही चौथऱ्यावर प्रवेश दिला जात नाही़ या नियमांचे पालन होणे गरजेचेच असल्याचे सांगत महिला भाविकांचे प्रश्न आणि देवस्थान विकासासाठी काम करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. (वार्ताहर)परवानगीचा कायदा...शनीचौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी सध्या होत आहे. सर्वच धर्मातील महिलांना त्यांच्या प्रार्थनास्थळावर जाऊ देण्याची परवानगी देण्याचा कायदा करायला हवा. नवीन विश्वस्त मंडळींनी यासाठी प्रयत्न करावा, असे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सांगितले.