शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भूमाता ब्रिगेडच्या देसाईंना जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: February 13, 2016 01:41 IST

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ‘तुमचाही दाभोलकर करू’ असे स्पष्टपणे पत्रामध्ये म्हटले आहे.

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ‘तुमचाही दाभोलकर करू’ असे स्पष्टपणे पत्रामध्ये म्हटले आहे. शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीसाठी देसाई यांनी भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून आंदोलन उभे केले आहे. त्यांना मिळालेल्या धमकीमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आपली कामगिरी खूप नावाजण्याजोगी आहे. तुम्ही हाती घेतलेले काम चांगले आहे. परंतु, शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याची मागणी घेऊन सुरू केलेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे, असे पत्रात म्हटले आहे. सरकारविरुद्ध लढत असाल तर अवश्य लढा. परंतु स्त्री पुरुष समानतेसाठी शिंगणापूरचीच निवड का, असा प्रश्नही पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी, बसचा पास नसल्यामुळे आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील मुलीसाठी, स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधासाठी ब्रिगेड का आंदोलन करीत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. निनावी पत्राद्वारे धमक्या देण्यापेक्षा समोर येऊन अथवा नावानिशी धमकी द्यावी. आम्ही त्याचा सामना करु. धमक्यांना आम्ही घाबरत नाही. भूमाता ब्रिगेडकडून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. महिलांच्या हक्कांसाठी आम्ही लढत राहू. अहमदनगरमधून हे पत्र आलेले असून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.- तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड