शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशाभिमान स्वदेशीतूनच

By admin | Updated: July 24, 2016 02:55 IST

लोकमान्य टिळकांनी समाजाला स्वराज्याचा महामंत्र, स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा आणि क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. सर्वसामान्यांमधील पौरुष्य जागे केले. समाजाचे अभिसरण, एकत्रीकरण

पुणे : लोकमान्य टिळकांनी समाजाला स्वराज्याचा महामंत्र, स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा आणि क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. सर्वसामान्यांमधील पौरुष्य जागे केले. समाजाचे अभिसरण, एकत्रीकरण करण्यासाठी व्यापक उपक्रम राबवले, स्वदेशीचा पुरस्कार केला. सध्याच्या काळात स्वदेशी अर्थात ‘मेक इन इंडिया’चा नारा देशासाठी उपयुक्त आहे. जगाच्या उत्पादनाची भूक भागवण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यामुळे, लोकमान्य टिळकांचे ‘स्वदेशी’चे स्वप्न पूर्ण करून आपण जाज्वल्य देशाभिमान जागवला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेच्या शताब्दी वर्षास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त लोकमान्य टिळक विचारमंच आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ‘टिळक इन अवर टाइम्स’ या पुस्तकाचे आणि लोकमान्य टिळकांवर आधारित फोटो बायोग्राफी इंग्रजी पुस्तकाचे तसेच ई-आवृत्तीचे प्रकाशन टिळक स्मारक मंदिर येथे फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, नगरसेविका मुक्ता टिळक, किरण ठाकूर, विजय केळकर, आमदार माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर चिरडण्यात आल्यानंतर समाजामध्ये कमालीचे नैराश्य निर्माण झाले होते. विजिगिषूू वृत्ती कमी झाली होती. समाजातील सर्व शक्तींना एकत्र करण्याचे काम त्यांनी केले. सध्याच्या काळात लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या स्वदेशीच्या सूत्राचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना लोकमान्यांच्या या सूत्राच्या हातात हात घालून जाणारी आहे. त्यामुळेच, संविधानास अनुरूप कार्य करून स्वराज्याकडून सुराज्याकडे जात लोकमान्यांचे स्वप्न आपण पूर्ण करायला हवे.’माशेलकर म्हणाले, ‘स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीतून टिळकांनी समाजाला व्यापक विचारसरणी दिली. स्वराजाच्या सूत्रातून त्यांनी पूर्वीच्या काळी मेक इन इंडियाचा संदेश दिला. महाराष्ट्राने ‘मेक इन इंडिया’चे नेतृत्व करायला हवे. विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांनी घाम गाळून, बुद्धीचा योग्य वापर करून प्रगती साधणे गरजेचे आहे. लोकमान्यांच्या स्पष्टवक्तेपणा, अन्यायाला विरोध, जिद्द, चिकाटी, स्वातंत्र्यप्रेम हे नव्या पिढीने आत्मसात केल्यास प्रगती होईल. (प्रतिनिधी)आरपीआय कार्यकर्त्याची घोषणाबाजी - मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान आरपीआयच्या एका कार्यकर्त्याने व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली. आपण पत्रकार असल्याचा बनाव करून तो मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सभागृहात दाखल झाला. पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.