शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाळवंटीप्रश्नी वारकऱ्यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

By admin | Updated: July 14, 2015 00:48 IST

वाळवंटी राहुट्या उभारू द्याव्या, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सोमवारी सबुरीचे धोरण अवलंबले. येत्या बुधवारी

- बाळासाहेब बोचरे,  सासवडवाळवंटी राहुट्या उभारू द्याव्या, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सोमवारी सबुरीचे धोरण अवलंबले. येत्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होतो, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे़ तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी जेजुरीत दाखल होणार आहे़न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगत सरकार वारकऱ्यांवर अनेक निर्बंध लादत आहे. तथापि, सरकारने मनात आणले तर काहीही होऊ शकते, असे वारकऱ्यांना वाटते़ २० दिवसांची पायी वारी आनंदमयी करायची की आंदोलनाला बसायचे, अशी द्विधा स्थिती वारकऱ्यांची असून पंढरपूरला जाईपर्यंत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी संगमवाडी येथे विसाव्यास थांबलेली असताना वारकऱ्यांनीठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे पालखी रथाला तेथेच थांबावेलागले. त्यावेळी दिशा ठरविण्यासाठी सासवड येथे दिंडी व बैठकनियोजित केली होती़ परंतु सबुरीने घेण्याच्या निर्णयामुळे ही बैठक रद्द करण्यात आली़ तथापि, वाल्हेकिंवा लोणंद येथे याबाबत बैठकहोऊ शकते़माऊली आज जेजुरीतसंत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी सकाळी ६ वाजता सासवडला निरोप देणार असून रात्री मुक्कामाला जेजुरीला जाणार आहे़ तर, बुधवारी ही पालखी वाल्हे मुक्कामी असेल.चालताना हरपते भान -भरणे हॉलंडहून भारतात येऊन प्रथमच पायीवारीत दाखल झालेले गुरुनाथ आणि सीमा भरणे हे दाम्पत्य वारीच्या अनुभवाबद्दल बोलत होते़ हे दाम्पत्य मूळचे गोव्याचे असून ६२ वर्षीय गुरुनाथ भरणे हे केमिकल इंजिनिअर आहेत. टीव्हीवर पालखी सोहळा पाहायचो; पण आपल्याला या वयात चालणे जमेल की नाही, असेच वाटायचे. पंढरपूरला प्रथमच आलो असून पुणे ते सासवड या वाटचालीत कसलाही त्रास न झाल्याने पंढरपूरपर्यंतची वारी पूर्ण होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. पायीवारी म्हणजे आनंदाचा सुख सोहळा असून चालताना हरिनामात तल्लीन झाल्याने भान हरपते अन् पायात बळ संचारते़ रात्री मुक्कामी गेल्यावरच आपण किती चाललो हे कळते़वारीत चालताना आपल्यापेक्षा वृद्ध लोक व अपंग लोकही वाटचाल करत होते़ हे पाहूनही पायात बळ संचारते, असेही ते म्हणाले.