शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माळघरला भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: June 9, 2017 03:05 IST

विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे.

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : या तालुक्यातील माळघर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे. या गावाजवळ एक बोअरिंग आहे. मात्र, तिच्यावर दिवसभरात ४० ते ५० हंडेच पाणी निघत असल्याने प्रत्येक कुटुंबाला दिवसाला दोनच हंडे पाणी ते ही आळीपाळीने भरावे लागत आहेत. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी टँकरची मागणी करूनही पंचायत समितीकडून अद्याप तो पुरविला गेला नसल्याने गावातील महिला व ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. तालुक्यापासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या माळघर गावात ५५ कुटुंबे राहत राहत असून परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हे गांव डोंगरावर असल्याने या गावातील नागरिकांसाठी तीन ते चार किलोमीटर अंतराच्या परिसरात नदी, नाले असा कोणताही जलस्त्रोत नाही. त्यामुळे येथील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी तडफडण्याची वेळ आली आहे. या बोरिंगवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येकाचे नंबर ठरवून घेतले आहेत. प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला दोनच हंडे पाणी मिळते. त्यामुळे नंबर लागण्यासाठी सात ते आठ तास वाट पहावी लागते. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी जव्हार पंचायत समितीकडे टँकरची मागणी करूनही अद्यापर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. या गावात माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. तर तेथील जनावरांची हालत काय असेल? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. बोअरिंगवर नंबर लावण्यासाठी येथील महिलांवर कधी रात्री तर कधी भल्या पहाटे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये पाणी भरण्यासाठी भांडणे ही होतात. >‘आमच्या गावाचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. आम्हाला रात्री बेरात्री पाण्यासाठी जंगलातील बोअरिंगवर जावे लागते. शासनाने लक्ष घालून टँकरची सोय करावी. - संगीता कोंगील, गृहिंणी,ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी पंचायत समितीकडे पाण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र,त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. - गोविंद गावित, माजी सरपंच