शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्ष पाटणकर यांचा राजीनामा

By admin | Updated: June 9, 2016 03:28 IST

द्धा पाटणकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला.

रोहा : रोहे-अष्टमी नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा श्रद्धा पाटणकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर गेली अनेक दिवस चर्चेत असणाऱ्या या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. काही महिन्यापूर्वी काही दिवसांकरिता उपनगराध्यक्ष या पदाकरिता श्रद्धा पाटणकर यांची सत्ताधारी राष्ट्रवादीकडून निवड करण्यात आली होती. विरोधी गटाकडून देखील त्यांना जाहीर पाठिंबा देत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या ठराविक मुदतीनंतर पाटणकर यांनी घूमजाव करीत राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस वाढली होती. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून हायकमांड यांनी सुतारवाडीत विशेष बैठक घेत त्यांना अनिश्चित काळाकरिता मुदतवाढ दिली. हायकमांडच्या या निर्णयाबद्दल अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु निवडणुका तोंडावर असल्याने पदाधिकाऱ्यांनी याविषयी अधिक चर्चा करणे टाळले. पाटणकर यांच्या मुदतवाढीमुळे संतप्त महिला नगरसेवकांनी यापुढे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हजेरी न लावता एक प्रकारे बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या भितीपोटी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पाटणकर यांनी मंगळवारी दुपारी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. पुढील ८-१० दिवसांत नवीन उपनगराध्यक्ष पदाची नेमणूक होणार आहे. या पदासाठी प्राजक्ता चव्हाण, जितेंद्र पडवळ व मानसी दाते यांची नावे चर्चेत आहेत. या निवडीकडेच साऱ्यांचे लक्ष आहे. (वार्ताहर)