शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यमापनाच्या पेपरफुटीची भीती

By admin | Updated: April 5, 2017 03:40 IST

मूल्यमापन चाचणीसाठी (बेसलाइन टेस्ट) प्रश्नपत्रिका कमी पडत असल्याने त्यांच्या झेरॉक्स काढण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येते आहे.

डोंबिवली : आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने मुलांचे भाषा आणि गणित या विषयातील आकलन तपासून पाहण्यासाठी गेली चार वर्षे होत असलेल्या मूल्यमापन चाचणीसाठी (बेसलाइन टेस्ट) प्रश्नपत्रिका कमी पडत असल्याने त्यांच्या झेरॉक्स काढण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येते आहे. त्या काढताना पेपर फुटण्याची भीती आहे, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. पुण्यातील महाराष्ट्र प्राधिकरणामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ही संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाते. ती परीक्षा ६ आणि ७ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी शाळांना सरकारकडून पुरवल्या गेलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थी संख्येनुसार नाहीत. दरवेळी त्या कमी पडतात. त्यामुळे त्यांची झेरॉक्स काढावी लागते. त्यात प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता असल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला. शाळांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स खाजगी झेरॉक्स सेंटरमधून काढून घ्याव्या लागतीत. तेथून किंवा त्यादरम्यानच्या प्रवासात कोठेही हे पेपर फुटू शकतात. त्याबाबत वेळोवेळी शिक्षण विभागाला सांगितले; तरीही फरक पडला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा घेतल्या जातात. आधीच्या वर्षातील अभ्यासक्रमावर त्या आधारित असतात. त्यातून मुलांचे भाषा आणि गणिताचे आकलन त्यातून तपासले जाते. पहिली व दुसरीसाठी २० गुण, तिसरी व चौथीसाठी ३० गुण, पाचवीसाठी ४० गुण, तर सहावी ते आठवीपर्यंत ५० गुणांची ही परीक्षा असते. या चाचणीसाठी शैक्षणिक विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रश्नपत्रिका पुरेशा नसल्याने पेपरफुटीचा धोका वाढतो. त्यामुळे हा खर्च क्षणात वाया जाऊ शकतो, याकडे मुख्याध्यापकांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)प्रश्नपत्रिका मिळतील : दहीतुलेविद्यार्थी संख्येनुसारच या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांत प्रश्नपत्रिका कमी आहेत, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे गट शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी सांगितले. बीएआरसीमध्ये प्रश्नपत्रिका वाटप सुरू आहे. ज्यांना कमी पडत आहेत, ते तिथून प्रश्नपात्रिका घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.