शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजनेपासून वंचित

By admin | Updated: May 30, 2016 01:43 IST

दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे

खोर : दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्या या भागामध्ये सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे नागरिकांचे जनजवीन विस्कळीत झाले आहे. दुष्काळाच्या झळा एवढ्या तीव्र झाल्या आहेत, की पाणी अडवणुकीचे सर्वच जलस्रोत रिकामे झालेले असून, पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची मोठी फरफट होत आहे. खोर परिसरामध्ये पद्मावती, फडतरेवस्ती व डोंबेवाडी पाझर तलाव असे तीन मोठे तलाव आहेत. मात्र, हे तलाव सध्या पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. दौंडमधून बारामतीला पाणी नेण्यात येत आहे. मात्र, दौंडची जनता फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. पैसे भरले, आंदोलने केली, तरच पाणी मिळते, हाच कायदा सध्या जास्तच जोर धरून आहे. पुरंदर जलसिंचन उपसा योजना व जनाई-शिरसाई उपसा योजना या सिंचनाच्या योजना सध्या कार्यान्वित असूनदेखील दौंडकरांना याचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. वरवंड तलावातून पाणी सुप्याच्या तलावात जनाई योजनेतून सोडण्यात आले आहे. मात्र, ज्या गावांना सध्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत त्याच गावामधून योजनेची पाईपलाईन गेली आहे. त्यांना फक्त बघ्याची भूमिका घेण्याची वेळ आली आहे. >पैसे भरलेच नाही : पाणी देण्यास टाळाटाळ खोर, देऊळगावगाडा परिसराला सिंचन योजनेतून पैसे न भरल्याने पाणी देण्यास टाळाटाळ होत आहे. या दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांचे दरडोई आर्थिक उत्पन्न असलेली शेतीच सध्या पडीक असल्याने संपूर्ण आर्थिक व्यवहार मंदावला गेला असल्याने सिंचन योजनेचे पाणी आणण्यासाठी पैसे भरावयाचे तरी कोठून? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. वर्षातून किमान दोन आवर्तने दौंडमधील दुष्काळी भागाला मिळणे गरजेचे आहे. पुरंदरमधील व बारामतीमधील दुष्काळी गावांना कार्यान्वित सिंचन योजनांचे पाणी सध्याच्या कालावधीत सुटले गेले आहे. मात्र, आम्ही दौंडकरांनी केवळ पैसे भरले नाही म्हणून आम्हाला पाणी देण्यास टाळाटाळ होत आहे, अशी व्यथा खोर व देऊळगावगाडा भागामधील नागरिकांची आहे. सध्याच्या बेताल परिस्थितीमध्ये एक तरी आवर्तन द्या, अशी हाक या भागामधील जनतेची आहे.