शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेनुसार जागावाटप

By admin | Updated: January 18, 2017 01:43 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली. पहिल्या टप्प्यातील चर्चेत धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन सत्ता प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करण्यावर एकमत झाले. क्षमतेनुसार जागा, प्रभागानुसार चर्चाही केली जाणार आहे. पन्नास टक्के जागा मिळाव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. महापालिकेच्या सत्तेत काँग्रेस भागीदार असून, विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यात आघाडीसंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर महापालिकेच्या वर्तुळात पक्षप्रवेशाच्या अनेक घडामोडी झाल्याने चर्चा थांबली होती. स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीच्या सूचना प्रदेशपातळीवरून शहराध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची सोमवारी रात्री बैठक झाली. या बैठकीस दोन्ही शहराध्यक्षच उपस्थित होते.दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडीस अनुकुलता दर्शविली. काँग्रेस पक्षाच्या विचारांची मतविभागणी होऊ नये, याची दखल दोन्ही पक्षांनी घ्यावी, ज्या प्रभागात ज्या पक्षाचा प्रभाव आहे, तिथे पक्षीय ताकदीनुसार जागा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच पन्नास टक्के जागा काँग्रेसला मिळाव्यात, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचेही चर्चेत पुढे आले. पहिल्या टप्प्यात आघाडीविषयी सकारात्मक चर्चा झाली. येत्या चार दिवसांत निर्णय होणार आहे. दरम्यान प्रभागनिहाय चर्चा होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)>महापालिका : समविचारी पक्षाशी आघाडीमहापालिका निवडणूकीसाठी पक्षश्रेष्ठींकडून सूचना मिळाल्यानंतर सोमवारी रात्री बैठक झाली. प्राथमिक चर्चा झाली. पक्षीय ताकद, प्रभाव पाहून जागा मिळाव्यात, अशी चर्चा झाली. तसेच समविचारी पक्षातील मतदानाची विभागणी होऊ नये, याबाबत आघाडी गरजेची असल्याचे दोन्ही पक्षांचे म्हणने आहे. बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे पक्षाचे निर्देश आहेत. त्यानुसार धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेसशी चर्चा सुरू झाली आहे. आघाडीबाबत आम्ही अनुकूल आहोत. प्रभागानुसार, काँग्रेसकडून कोणता प्रस्ताव येईल, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांतील मतांचा सन्मान राखण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.