शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

डिनर पार्टीमधून आपचे ९१ लाख रुपये जमा

By admin | Updated: November 28, 2014 17:18 IST

निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने ९१ लाख रुपये एका रात्रीत जमवले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने ९१ लाख रुपये एका रात्रीत जमवले आहेत.  निवडणूका लढवण्यासाठी आम आदमी पक्षाने मागील निवडणुकांचे तंत्र वापरत यंदाही डिनर पार्टी आयोजित करत जनतेकडून पैसे जमवण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या डिनरपार्टीतून आपने ९१ लाख रुपये जमवले असल्याचे आपच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी असे सांगितले आहे. या पार्टिमध्ये आमच्या पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणात आले असून  डिनर पार्टीच्या पास मधून आम्ही ३६ लाख रुपये जमवले असून ३६ लाख रुपये हे चेक द्वारे वर्गणी म्हणून देण्यात आले आहेत. तसेच २१ लाख रुपये आमच्या कार्यकर्त्यांकडून जमवण्यात आले असल्याचे प्रिती शर्मा मेनन यांनी सांगितले आहे. गुरुवारी झालेल्या डिनरपार्टीमध्ये २०० जणांसाठी जागा होत्या. प्रत्येक ताटाची किंमत २० हजार रुपये इतकी ठेवण्यात आली होती. आपच्या वर्गणीदारांमध्ये युवकांची संख्या मोठ्याप्रमाणात असून हिरे व्यापारी, सिने दिग्दर्शकांचाही सामावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपचे सर्वाधिक वर्गणीदार महाराष्ट्रात असून त्याखालोखाल दिल्ली व उत्तर प्रदेशातील जनता आपची मोठ्याप्रमाणात वर्गणीदार आहे. महाराष्ट्रातील आपच्या कार्यकर्त्यांनी पुढील दोन महिन्यात पाच कोटी रुपये जमवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. 
लोकसभा निवडणुकांचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत यापुढील वर्गणी जमवण्याची मोहिम बेंगळुरु येथे होणार आहे. या निवडणुकांसाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले असल्याचेही प्रिती मेनन शर्मांनी सांगितले. वर्गणी जमवण्यासाठी भाजपा ज्याप्रमाणे ब्रँड मोदींचा वापर करते त्याप्रमाणे आम्ही ऑनलाइन वर्गणी जमवण्याची नवीन युक्ती शोधली आहे. # (हॅश टॅग) फंड ऑनेस्ट पॉलिटिक्स या नावाने वर्गणी दारांची नावे आपने ट्विटद्वारे जाहीर केली आहेत.