शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात हमीभावाने तूर खरेदीचा बोजवारा

By admin | Updated: February 27, 2017 12:22 IST

शेतकरी चिंतीत: बारदाना आणि गोदामांची वानवा

राज्यात हमीभावाने तूर खरेदीचा बोजवारानारायण चव्हाण - आॅनलाईन लोकमत सोलापूरराज्य शासनाने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या तूर खरेदी केंद्रात सध्या शुकशुकाट आहे. तूर साठवण्यासाठी गोदामांची कमतरता आणि बारदान्याची टंचाई ही त्यामागची कारणे सांगितली जात आहेत. येत्या काही दिवसात हमीभावाची तूर खरेदी केंद्रे सुरु झाली नाहीत तर तूर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शासनाच्या संदिग्ध भूमिकेने चिंतीत झाला आहे. मिळेत त्या भावाने तुरीची बाजारात विक्री करण्याचा एकच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.राज्यात नाफेडकडून हमीभावाने तूर खरेदीची केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तुरीला ५०५० रुपये हमीभाव देण्यात आल्याने बाजारात होणाऱ्या भावातील घसरणीला पर्याय मिळाला. परंतु पणन मंडळासह तूर खरेदी केंद्र चालवणाऱ्या राज्य वखार महामंडळ, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, शेतकरी उत्पादन कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून तुरीची खरेदी थांबवली आहे. त्यामुळे बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. तूर विक्रीसाठी आलेला शेतकरी चार-चार दिवस शेतमालामुळे बाजारपेठांमध्ये मुक्कामी राहत आहे. ---------------------बारदाना टंचाईमार्केटिंग फेडरेशनला यंदाच्या हंगामात १५ लाख क्विंटल हमीभावाने तूर खरेदी करण्याचा इष्टांक देण्यात आला होता. आतापर्यंत फेडरेशनने १३ लाख क्विंटलहून अधिक खरेदी केली आहे. याशिवाय विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने ४ लाख क्विंटल, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ३.५ लाख क्विंटल, राज्य वखार महामंडळाने ४ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. तुरीसाठी बारदान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक हमीभाव केंद्रांवर बारदाना टंचाईचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.----------------------- गोदामांची समस्या खरेदी केलेल्या तुरीची पोती साठवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या गोदामांची साठवण क्षमता अपुरी पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वखार महामंडळाची गोदामे आहेत. अन्य शेतीमालासह तुरीच्या साठवणुकीने ही सर्व गोदामे तुडुंब भरली आहेत. नव्याने खरेदी सुरु केली तर हा माल साठवण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. खरेदी केंद्रांपासून ५० कि. मी. च्या अंतरावरील गोदामात होणारा वाहतूक खर्च मार्केटिंग फेडरेशनकडून केला जातो. त्यापुढील अंतरावर असलेल्या गोदामात वाहतूक करण्याचा भार कोण उचलणार हा प्रश्न पणन खात्यासमोर आहे.--------------------सहकारमंत्र्यांचा पाठपुरावाकोणत्याही स्थितीत तुरीची हमीभाव केंद्रे बंद करायची नाहीत यावर राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख ठाम आहेत. खरेदी केंद्रांसंदर्भात आलेल्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी नुकतीच पणन महामंडळ, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने केवळ १५ लाख तूर खरेदीची परवानगी राज्याला दिली होती. हा इष्टांक पूर्ण झाला आहे तरीही राज्यातील खरेदी केंद्रांवर तुरीची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने वाढीव तूर खरेदीची परवानगी मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.------------------------बाजारभावात घसरणशासनाचे तूर खरेदी केंद्र बंद पडल्याने व्यापारी, दाळ उत्पादक कंपन्या आणि दलालांची चांदी झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावाने तूर खरेदी करण्याचा सपाटा या मंडळींनी चालवला आहे. त्यामुळे तुरीच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. ५०५० रुपये हमीभाव असताना बाजारभाव ४२०० रुपयांपर्यंत होता. आता त्यात आणखी घट झाली असून, ३७०० ते ४ हजारांपर्यंत तो घसरला आहे. -----------------------तुरीच्या बारदान्याची कमतरता आहे. शिल्लक बारदाना असेल तेथे खरेदी सुरु आहे. वाढीव बारदान्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. दोन दिवसांत कलकत्त्याहून बारदाणा उपलब्ध होताच पुन्हा खरेदी केंद्रे सुरु होतील.- डॉ. राजाराम दिघेमुख्य कार्यकारी अधिकारी, पणन महामंडळ, पुणे