शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विभागीय नेत्रशास्त्र संस्था

By admin | Updated: July 15, 2017 04:29 IST

नेत्ररुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकत्रित मिळावेत, यासाठी विभागीय नेत्रशास्त्र संस्था स्थापन करण्यात येणार आहे

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नेत्ररुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकत्रित मिळावेत, यासाठी विभागीय नेत्रशास्त्र संस्था स्थापन करण्यात येणार आहे, तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयात एक संचालक व सात उपसंचालकांची पदे निर्माण करण्यात येत आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सार्वजनिक आरोग्य विभागात संचालकांची दोन पदे निर्माण केली गेली, पण कामाचे वाटप करण्यास गेल्या आठ महिन्यांपासून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि प्रधान सचिवांना वेळ मिळालेला नाही. मात्र, त्याच वेळी वैद्यकीय शिक्षण संचालनालयात नेत्रसंचालकाचे एक व उपसंचालकांची सात पदे निर्माण करण्यात येत आहेत. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमधून डोळ्यांवर केले जाणारे उपचार, नेत्रविभागातून पदव्युत्तर व पदवीपूर्व नेत्रशास्त्रातील अभ्यासक्रमासंबंधीचे आयोजन, जागा वाढविणे, तसेच केंद्र व राज्य शासनातर्फे अंधत्व निवारणाच्या अनुषंगाने राबविण्यात येणारे प्रकल्प, जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकल्प व योजना यांची योग्य रितीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी विभागीय नेत्रशास्त्र संस्था कार्य करेल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.वैद्यकीय संचालनालयाच्या अंतर्गत यापूर्वी ७ वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये होती. त्यात वाढ होऊन, आता ती संख्या १६ महाविद्यालयांपर्यंत गेली आहे. शिवाय ३ दंत महाविद्यालये व रुग्णालये, परिचर्या शिक्षण संस्था, आरोग्य पथके कार्यरत असून, तीन नवीन वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये प्रस्तावित असल्याचे सांगून, महाजन म्हणाले, ‘वाढती प्रवेश क्षमता, वैद्यकीय महाविद्यालयांमधून मिळणाऱ्या सेवा आणि त्यात केंद्रीय योजनांचा वाढता सहभाग लक्षात घेता, कामांचा वाढता ताण लक्षात घेऊन पदे व जबाबदाऱ्यांमध्ये बदल करणे आवश्यक ठरल्याने, नवीन पदे तयार करण्यात येत आहेत.’>एकच विभाग असावा!आघाडी सरकारच्या काळात राजकीय सोय म्हणून वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग वेगवेगळे केले गेले. मात्र, युतीच्या शासनात हे दोन विभाग वेगवेगळे करण्याची कोणतीही राजकीय मजबुरी नाही. दोन्ही खाती एकत्र करून कोणाकडे तरी एकाकडे द्या, अशी विनंती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनीही दोन्ही विभाग एकत्र करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. जर असे झाले, तर दोन विभागांना खेळवून स्वत:चे हेतू साध्य करून घेणारी, अधिकारी आणि औषध विक्रेत्यांची टोळी नियंत्रणात येईल, असे या विभागात काम करणाऱ्यांचे मत आहे.