शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभागानेच जाळली जनावरांची औषधी!

By admin | Updated: March 3, 2017 00:42 IST

मालेगाव येथील प्रकार : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा चौकशीचा आदेश

वाशिम, दि.२ - मालेगाव येथील पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या दवाखान्यालगतच, जनावरांसाठी उपयुक्त असणारी शासकीय औषधी काही अधिकाऱ्यांनी जाळून नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी उघडकीस आणला. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे यांच्याकडे तक्रार येताच, चौकशीचा आदेश देण्यात आला.ग्रामीण भागातील जनावरांवर तातडीने व अत्यल्प दरात तसेच मोफत उपचार मिळावे म्हणून पशुसंवर्धन उपचार केंद्र व दवाखान्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या दवाखान्यांत लाखमोलाचा औषधी साठाही पुरविला जातो. मालेगाव येथील पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या दवाखान्यामागील मोकळ्या जागेत गुरुवारी दुपारच्या सुमारास जनावरांची औषधी जाळून नष्ट करण्यात आली. ही बाब शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान बोरकर यांच्या निदर्शनात येताच घटनास्थळी शिवसैनिक जमा झाले. यावेळी न जळालेली काही औषधी पुरावा म्हणून घेण्यात आली. यापैकी काही औषधीवर ‘एक्स्पायरी डेट’ ही फेब्रुवारी २०१८ असल्याचे नमूद आहे. आणखी एक वर्षभर मुदत असतानाही औषधी जाळून का टाकण्यात आली, यामागे मोठे घबाड तर नाही ना? या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी भगवान बोरकर, गजानन बोरचाटे, गजानन केंद्रे आदींनी केली आहे.चौकशीचा आदेश दिला - डॉ. कल्यापुरेमालेगाव येथे घडलेल्या औषध जाळण्याच्या गंभीर प्रकारासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल. दोषींविरूद्ध निश्चितच कारवाई केली जाईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे यांनी सांगितले.