शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवनार डंपिंग ग्राऊंड पुन्हा आगीच्या विळख्यात

By admin | Updated: June 9, 2016 03:19 IST

मुंबईतलं सगळ्यात मोठं डंपिंग ग्राऊंड असलेल्या देवनार डंपिंग ग्राऊंडला पुन्हा आग लागली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९- मुंबईतलं सगळ्यात मोठं डंपिंग ग्राऊंड असलेल्या देवनार डंपिंग ग्राऊंडला बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या पुन्हा आग लागली होती. आग हळूहळू पसरत जाऊन आगीनं उग्ररूप धारण केलं असतानाच घटनास्थळी उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विजवण्याचे तत्काळ प्रयत्न सुरू केले. त्यानंतर मानखुर्द अग्निशमन दलाच्या एकूण ४ गाड्या आणि ४ वॉटर टँकरनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कूलिंग आॅपरेशन सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.

आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत होता. मागच्या वेळी लागलेल्या आगीनं प्रदूषणाची उच्चांकी पातळी गाठली होती. १३२ हेक्टर जागेवर देवनार डंपिंग ग्राऊंड पसरलं असून, जवळपास ही आग पसरत चालली आहे. 27 जानेवारीला लागलेली आगही जवळपास 8 दिवस धुसमत राहिली होती. त्यावेळी आगीच्या धुरात मिथेन आणि विषारी द्रव्ये मिसळल्यानं धुराचा थर बनला होता.

(देवनार डंपिंग ग्राऊंडवर तोडगा काढण्यासाठी सचिनचं महापालिका आयुक्तांना पत्र)

 हा थर  देवनारचा आजूबाजूचा परिसर म्हणजेच गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूर, टिळकनगर, घाटकोपर, कुर्ला,वडाळा, शीव परिसरात पसरला होता. काही प्रमाणात पश्चिम उपनगरंही या प्रदूषणानं प्रभावित झाली होती. आजूबाजूच्या परिसरातली लोकांना डोळे चुरचुरणे, खोकला, घशामध्ये खवखवण्यासारखे विकार बळावले होते. त्यामुळे ही आग वेळीच विझवणं गरजेचं आहे.