शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मंंगळ असल्याचे सांगून विवाहास नकार

By admin | Updated: November 2, 2016 00:52 IST

साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी मुलीला मंगळ असल्याचे कारण सांगून विवाह करण्यास नकार दिल्याची घटना वाघोलीतील एक कुटुंबासोबत घडली.

वाघोली : साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी मुलीला मंगळ असल्याचे कारण सांगून विवाह करण्यास नकार दिल्याची घटना वाघोलीतील एक कुटुंबासोबत घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची फिर्याद दिली. अमरावतीतील नवऱ्या मुलासह आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश विष्णू राऊत आणि त्याचे वडील विष्णू राऊत (रा. अमरावती) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाघोली येथील एका कुटुंबातील एक मुलीचे अमरावती येथील विष्णू राऊत यांचा मुलगा प्रकाश राऊत यांच्यासोबत लग्न ठरविण्यात आले होते. २८ आॅगस्ट रोजी वाघोली येथील मंगल कार्यालयामध्ये साखरपुडा देखील झाला होता. डिसेंबर महिन्यामध्ये विवाहाची तारीख ठरवण्यात आली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी विवाहास आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. मात्र, काही दिवसांनंतर राऊत कुटुंबांकडून मुलीला मंगळ असल्याचे कारण सांगून विवाह करण्यास नकार दिला.मुलीच्या वडिलांनी मुलीला मंगळ नसल्याचे सांगूनदेखील मान्य करण्यात आले नाही. यामुळे विवाह रद्द करण्यात आला. लग्नानिमित्त करण्यात आलेला खर्च, कुटुंबाची झालेली नाचक्की आणि मंगळ असल्याचे क्षुल्लक कारण देऊन विवाह रद्द करून फसवणूक केल्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>आधुनिक विज्ञान युग असतानादेखील मुलीला मंगळ असल्याचे क्षुल्लक कारण देऊन विवाह सहज मोडणे ही गोष्ट शोभणारी नाही. लग्नासाठीचा खर्च वाया गेलाच,परंतु कुटुंबाचीदेखील नाचक्की झाली आहे. मुलाकडील सुशिक्षित असतानादेखील अशा गोष्टी घडत असतील, तर अशा प्रवृतींना धडा शिकवणे गरजेचे आहे.- मुलीचे वडील