शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक संबंधास नकार दिल्याने हत्या?

By admin | Updated: March 19, 2017 02:01 IST

जगद साई या तरुणाने समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने, राजेश नेपाळी याने त्याची हत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास

बदलापूर : जगद साई या तरुणाने समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने, राजेश नेपाळी याने त्याची हत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. राजेश याने त्याचा मित्र जगद साई याची हत्या करून, धड आणि मुंडके वेगळे केले होते. राजेशवर यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. राजेश हा कात्रप येथील जय मल्हार चायनीज दुकानात कुक म्हणून कामाला होता. राजेशने आपला मित्र जगद याला दुकानात बोलावले होते. ज्या दिवशी जगदची हत्या झाली, त्या दिवशी चायनीज दुकानाचा मालक, त्याचा वाहनचालक, राजेश आणि जगद दारू पिण्यास बसले होते. रात्री १२ वाजता दारू पिऊन झाल्यावर, मालक आणि वाहनचालक हे दोघे निघून गेले. दुकानात राजेश आणि जगद हे दोघेच होते. त्याच रात्री राजेश याने दारूच्या नशेत जगद याच्याकडे समलैंगिक संबंधाची मागणी केली होती, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. त्यास नकार दिल्यानेच, राजेशने जगदची हत्या करून त्याचे मुंडके वेगळे केले, असा पोलिसांचा अंदाज आहे.राजेश तपासादरम्यान योग्य माहिती देत नसल्याने, पोलिसांनी हत्येचे कारण अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र, तपासात समलैंगिक संबंध हेच कारण पुढे येत आहे. पोलिसांनी आरोपीचे जुने रेकॉर्ड काढले असता, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे समोर येत आहे. २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी असल्याने, त्या दरम्यान आरोपीकडून सर्व माहिती घेऊन हत्येचे कारण स्पष्ट केले जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राजभोज यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)व्हॉट्स अ‍ॅपमुळे त्वरित अटक हत्या करून पळून जाणाऱ्या राजेश नेपाळी या तरुणाला लागलीच अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीचे छायाचित्र भुसावळ येथील रेल्वे पोलिसांना व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवत, त्याला लागलीच ताब्यात घेण्यात आले. राजेश हा नेपाळ येथील त्याच्या मूळ गावी रेल्वेने पळून जाण्याचा दाट संशय पोलिसांना होता. त्याने कल्याण रेल्वे स्थानकातून पुष्पक एक्स्प्रेस पकडली असेल व ती दुपारी ३च्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकात पोहोचेल, असाही अंदाज पोलिसांनी बांधला होता. त्यानुसार, अत्यंत कमी वेळेत राजेश नेपाळीची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्स अ‍ॅपचा आधार घेतला. त्यानुसार, भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पकच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करणाऱ्या राजेशला ताब्यात घेतले.