शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

पंढरीत डेंग्यू सदृश रुग्ण

By admin | Updated: July 27, 2016 21:42 IST

पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या कालावधीत मौत का कुआ या खेळात वाहन चालवण्याचे धाडसी काम करणार्‍या तरुणाला डेंग्यू सदृश्य असल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.

सचिन कांबळे

पंढरपूर :  पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या कालावधीत मौत का कुआ या खेळात वाहन चालवण्याचे धाडसी काम करणार्‍या तरुणाला डेंग्यू सदृश्य असल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. या तरुणाचे नाव मोहम्मंद रसीद अनसारी (वय 26, रा. मुजफर नगर, उत्तर प्रदेश) आहे.आषाढी यात्रा कालावधीत लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येतात. यामुळे पंढरपूर येथे व्यवसायासाठी देशभरातून छोटे-मोठे व्यापारी येतात.  त्याच पध्दतीने मौत का कुआ असा जीवा बेतनारा चारचाकी व दुचाकी वाहनांचा खेळ घेऊन उत्तर प्रदेशातील काही तरुण पैसे कमविण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी आले आहेत.

मात्र मौत का कुआमध्ये धाडसाने वाहन चालवणारा मोहम्मंद अनसारी याला ताप आल्याच्या कारणावरुन खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्या ठिकाणी तो डेंग्यू सदृश्य असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्याला सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेहण्यात आल्याची माहीती त्याच्याबरोबर काम करणार्‍या मोहम्मंद अनीस अनसारी यांनी दिली.