शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

जिल्ह्यात 350 रूग्णांना डेंग्यूची लागण

By admin | Updated: September 6, 2014 22:54 IST

जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागासह ग्रामीण भागात गॅस्ट्रो, अतिसार, हगवण, काविळ, विषमज्वर, डेंग्यू, मलेरिया गोवर, या साथीच्या आजारांनी रूग्ण त्रस्त झाले आहेत.

सुरेश लोखंडे -  ठाणो 
जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागासह ग्रामीण भागात गॅस्ट्रो, अतिसार, हगवण, काविळ, विषमज्वर, डेंग्यू, मलेरिया  गोवर, या साथीच्या आजारांनी रूग्ण  त्रस्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1246 रूग्ण आतार्पयत मलेरियाने त्रस्त असून 35क् रूग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. गणोशोत्सवाच्या काळात  या रूग्ण संख्येत मोठय़ाप्रमाणात 
वाढ होण्याची शक्यता वर्तविली 
जात आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  
गणोशोत्सवानंतर सुमारे 15 दिवसांनी नवरात्रोत्सव येऊ घातला आहे. याकाळात बाजारपेठा, दुकाने आदी ठिकाणी ग्राहक, बस स्थानक, रेल्वे स्टेशन  परिसरात प्रवासी आणि गणोश मंडळ 
परिसरात भाविकाची ये-जा मोठय़ाप्रमाणात सुरू आहे. यातून या साथीच्या आजाराची लागण वाढण्याची शक्यता अधिक आहे. यास अनुसरून लोकमतने जिल्ह्यातील साथ रोगाचा आढावा घेतला असता मलेरियांचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून जीव घेण्या डेंग्यूची रूग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, ठाणो व नवी मुंबइ आदी महानगरपालिकांसह, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात रूग्ण  मलेरियाने  त्रस्त आहेत. एकाच घरात सुमारे तीन  - तीन रूग्ण  आढळून येत आहे. पावसाळ्यात औषध फवारणी करून साथीचे आजार वेळीच रोखण्याची गरज  आहे. 
मात्र पावसाळा संपत आलेला असतानाही औषध फवारणी 
कोठेही झालेली नसल्याचे 
निदर्शनात आले आहे. एकटय़ा ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 119 डेंग्यूचे रूग्ण आढळले आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. 
 
मलेरियासह डेंग्यूच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे काही ठिकाणी मृत्यू देखील झाले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात आलबेल असल्याचे सांगून दुर्लक्षित व निष्काळजीपणावर पांघरूण घालत आहेत. या आधी देखील जिल्ह्यातील रूग्ण संख्येची  जाणीव करून देण्यात आली होती़ 
 
त्याकडे देखील दुर्लक्ष केल्याचे उघड झाल आहे. यामध्ये  शहापूर तालुक्यात आवरे गावात डेंग्यूचे संशयीत 79 रूग्ण आढळले असतानाच सहा जणांना लागण झाल्याचे उघड झाले आहे. तर भिवंडीच्या न्यू आझाद नगरमध्ये 16, मुरबाडमधील सायले येथे 27 तर ठाणो महापालिका क्षेत्रतील उथळसर, राबोडी परिसरात 59 संशयीत रूग्णासह  वाडयाच्या आंबीटघरमध्ये 25 रूग्ण, मीरा-भाईंदर परिसरात 67 अािण वसई शहरालगतच्या निळेगांव भागात सहा संशयीत रूग्ण आढळले आहेत़ मात्र आरोग्य यंत्रणोचे त्याकडे दुर्लक्षच आहे.
 
4साध्या तापासह हिवतापाने जिल्ह्यात केवळ 381 रूग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. याशिवाय पालघरच्या सातपाटी भागात अद्यापही 295 हिवतापाचे, साध्या तापाचे 216 रूग्ण,  तर मुरबाड, वाडय़ात 18क्असे सुमारे 878 रूग्ण जुलै अखेर असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आढळली  आहे. 
4तर ऑगस्टच्या रूग्ण संख्येचा अहवाल या महिन्यात 15 सप्टेंबरनंतर प्राप्त होणार असल्याचे उत्तर आरोग्य विभाग देत आहे. 
 
4परंतु, सध्या जिल्ह्यात कोठेही साथीचा उद्रेक झालेला  नाही. याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी रूग्ण संख्या देखील कमी आहे. पण या सणासुदीच्या कालावधीत स्थानिक आरोग्य यंत्रणा वेळीच सतर्क करण्याचे आश्वासन आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी लोकमतला दिल़े