शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

डेंगी, चिकुनगुनियासदृश ५०० रुग्ण

By admin | Updated: September 22, 2016 02:09 IST

शहरात डेंगी, चिकुनगुनियासदृश रोगांची लक्षणे असणारे किमान ५०० रुग्ण असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले.

इंदापूर : शहरात डेंगी, चिकुनगुनियासदृश रोगांची लक्षणे असणारे किमान ५०० रुग्ण असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले. तथापि, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या व नगर परिषद आरोग्य विभागाच्या प्रमुखांच्या दाव्यानुसार शहरातील परिस्थिती जिल्ह्यातील इतर ठिकाणांएवढी गंभीर नाही. दीड महिन्यापासून शहरातील डॉ. आंबेडकरनगर, अण्णा भाऊ साठेनगर, आठभाईमळा, सरस्वतीनगर, वडारगल्ली व शहराच्या वाढीव हद्दीतील दत्तनगर, गणेशनगर आदी भागांत डेंगी, चिकुनगुनियासदृश रोगांची लक्षणे असणारे रुग्ण आहेत. शहरात अशी लक्षणे असणारे किमान ५०० रुग्ण असल्याचे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे म्हणाले, की गेल्या पंधरा ते वीस दिवसांत खासगी रुग्णालयात पाच ते सहा व उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दोन ते तीन रुग्णांना चिकुनगुनिया झाल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्यावरील उपचार यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. रुग्णालयात असे रुग्ण दाखल करण्याची, संबंधित सर्व तपासण्या करण्याची सोय आहे. औषधेदेखील आहेत. एनएसवन हे किटही उपलब्ध आहे. शहरात मलेरिया नियंत्रण विभागाचे कर्मचारी निरंतर सर्वेक्षण करीत आहेत. (वार्ताहर)नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुजय मखरे यांनी सांगितले, की डासांच्या निर्मूलनासाठी यंत्राच्या माध्यमातून धुरळणी करण्यात येते. मंडई, कत्तलखाने, कचराकुंड्या या ठिकाणी बेगॉन, पॅरथम, बीसी पावडर, मलेरिया आॅईलचा वापर केला जातो आहे. पाच कर्मचाऱ्यांचीयासाठी नेमणूक करण्यात आली आहे. महिलांची १०५, पुरुषांची ९५ सार्वजनिक शौचालये दररोज साफ केली जात आहेत. या संदर्भात पाहणी केली असता, डॉ. आंबेडकरनगर, अण्णा भाऊ साठेनगर, कसाबगल्ली या भागातील अस्वच्छता, उघडी गटारे अशा रोगांच्या प्रसाराची केंद्रे झाल्याचे दिसून येते. इंदापूर शहरातील इतर भागांत झाकीव गटारे झाली आहेत, होत आहेत. डॉ. आंबेडकरनगरमध्ये गटारांची दुरवस्था झाली आहे.सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नाही, अशा तक्रारी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कांबळे यांनी केल्या.नगर परिषदेकडे १० ते १२ वर्षांपूर्वी घेतलेली चार धुरळणी यंत्रे आहेत. त्यांपैकी तीन नादुरुस्त आहेत.>कुरवली परिसरात जांब, मानकरवाडी, चिखली, कदमवस्ती, मानेवस्ती या भागातील वाड्यावस्त्यांत आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.स्वच्छतेचा बाबतीत घ्यावी लागणारी काळजी, मुलाचे आरोग्य, परिसर स्वच्छता, आजाराबाबत स्वच्छतेचे महत्त्व वाड्यावस्त्यांतील नागरिकांना सांगण्यात येत आहे.असल्यामुळे या भागात डेंगी व चिकुनगुनियाचा एकही रुग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य उपकेंद्रातून देण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने परिसरातील कुरवली व मानकरवाडी या विद्यालयांत डेंगी व चिकुनगुनिया आजारांविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपकेंद्राने दिली आहे. नवीन यंत्र घेण्याचा विचार नगर परिषद करीत नाही, ही मोठी अडचण आहे. एकाच यंत्रावर काम चालवले जाते.या रोगांविषयी घ्यायच्या दक्षतेची माहिती असणारे पत्रक शहरात वाटण्यात आले आहे.