शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर निदर्शने

By admin | Updated: November 8, 2016 04:55 IST

सांगली—कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काढलेल्या ऊसदराच्या तोडग्यास विरोध करीत सकल

इस्लामपूर (जि. सांगली) : सांगली—कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काढलेल्या ऊसदराच्या तोडग्यास विरोध करीत सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपुरातील घरासमोर निदर्शने केली. विठुनामाचा गजर करतानाच खोत यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांनी यातील १९ कार्यकर्त्यांवर जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर धडक मारली. मात्र पोलिसांनी ३०० फूट अंतरावरच त्यांना रोखल्यामुळे, जवळपास चार तास तेथेच विठुनामाचा गजर करीत आंदोलक थांबले. खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांचा निषेध करण्यात आला. शंभरावर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.या वेळी बळिराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. एफआरपी अधिक १७५ रुपयांचा तोडगा म्हणजे लबाडाघरचे आमंत्रणच आहे. या तोडग्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ३५०० रुपयांची पहिली उचल घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. आता सत्तेत सहभाग असल्यामुळे आंदोलन टाळून तोडग्याच्या नावाखाली पुन्हा त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका असून तो आम्ही हाणून पाडणार आहोत. (वार्ताहर)सदाभाऊ निघाले दौऱ्यावरमुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतमालाची थेट बाजारत विक्री करण्याची व्यवस्था सुरू केल्यानंतर आता पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन राज्यांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. कांदा आणि इतर शेतमालाचे भाव अधुनमधून पडतात आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. पश्चिम बंगालमध्ये आणि तेथून बांगलादेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्यापैकी ८० टक्के कांदा हा महाराष्ट्रातून जातो. या शिवाय, द्राक्षे, बेदाणे, संत्री, मोसंबी, डाळींबही मोठ्या प्रमाणात पाठविले जाते. हा शेतमाल दलालांच्या विविध टप्प्यांतून पाठविण्याऐवजी त्याला या दोन राज्यांमध्ये थेट बाजारपेठेत विक्रीला नेण्याचा विचार आता समोर आला आहे. त्या दृष्टीनेच या दोन राज्यांमध्ये जाऊन अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोत यांना दिले.