शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कासाठी अंमलबजावणी हवी

By admin | Updated: August 2, 2016 03:54 IST

२००६, २००८ आणि २०१२ या काळात अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमात महत्त्वाच्या सुधारणा झाल्या.

ठाणे : २००६, २००८ आणि २०१२ या काळात अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमात महत्त्वाच्या सुधारणा झाल्या. त्यानुसार आदिवासी कुटुंबियाना वनहक्क देण्यात संबंधीत खात्याकडून विलंब होतो. तो न होता अधिकाऱ्यांनी त्वरित अधिनियमाची योग्य, सुलभ अंमलबजावणी करावी, असे राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंह यांनी स्पष्ट केले.वन संवर्धनासाठी उपयोगासाठी होत असेल तर वन जमिनीवरचे अतिक्र मण नियमित करता येत असल्याचेही त्यांनी उपस्थितांना पटवून दिले.आदिवासी विभागातर्फे ठाण्यातील नियोजन भवन सभागृहात अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६, २००८ व सुधारणा नियम २०१२ यासंदर्भात एक दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी परिमल सिंह बोलत होते. या बैठकीस आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव, निवासी जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, ठाणे जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी के. पी. सिंग आणि खोज या संस्थेच्या कार्यकारी संचालक पोर्णिमा उपाध्याय यांच्यासह जिल्हा समन्वयक व सामूहिक वन हक्क व्यवस्थापक आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीत चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या विविध जिल्ह्यातील समन्वयक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.अध्यादेशातील सुधारणेनुसार जिल्हास्तरीय वनहक्क समिती, जिल्हास्तरीय वनहक्क समिती यांचे दावे आणि अपील यावर दिलेले निकाल हा अंतिम असून तो बंधनकारक असेल हे गृहीत धरु न प्रत्येक संबंधित खात्यांनी त्याची काटेकोर अमंलबजावणी करावी, असे परिमल सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात तीन लाख लोकांनी वन जमिनी कसण्यासाठी मागितल्या आहेत. >वनजमिनी सुपीक करण्यावर भर हवासंबंधितांनी १५ दिवसात अशा वनजमिनी ज्यांच्याकडे आहेत, त्यांची नोंद करु न त्या सुपीक कशा होतील याकडे लक्ष द्यावे. आदिवासी किंवा जमातींचा आधार घेऊन वन जमिनी सुपीक करण्यावर भर दिला पाहिजे. वनक्षेत्र वाढण्यासाठी झाडेही लावली पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आदिवासी आयुक्त राजीव जाधव साांगितले. >या जमिनींसाठी अनेक दावे प्रलंबित आहेत, ते तत्काळ सोडविणे गरजेचे आहे. वनजमीन जर अनुसूचित जमातीचे लोक कसत असतील, तर त्यांना त्याची मालकी कशी देता येईल याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष दिले पाहिजे. त्यांचे हक्क दिले आणि या जमिनीत त्यांनी सुधारणा केल्या तर अन्न धान्याचा पुरवठा वाढू शकतो. >बांधबंदिस्ती करण्याबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काय काय करता येईल याकडे कृषी ,महसूल व इतर खात्यांनी लक्ष देण्याचे मार्गदर्शन जाधव यांनी केले. या वेळी वनहक्क कायदा व वनविभागाचे योगदान, विभागाचा समन्वय सामूहिक वनहक्क कायदा, मेळघाट विकास आराखडा, शासनाची धोरणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.