मुंबई : राजकीय फायद्यासाठी निर्माण केला जाणार धार्मिक उन्माद नेहमीचेच. पण, वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीच्या प्रचार धुमाळीत अनोख्या जातीय सलोख्याचे उदाहरण पाहायला मिळाले. सांताक्रुजला एमआयएमची सभा, व्यासपीठावरुन नेत्यांची प्रक्षोभक भाषणे आणि त्याचवेळी ढोलताशांच्या गजरात, वाजतगाजत हनुमान जयंतीची पालखी... पालखीचे आगमन होताच एमआयएमच्या नेत्यांनी सभा थांबवत भक्तांचे स्वागत केले. शांततेचे आवाहन करत मुस्लिमांनी मानवी साखळी बनवत पालखीला वाट दिली. तर, हनुमान भक्तांनीही ढोलताशे वाजविणे बंद केले. दोन्ही बाजूंच्या या वर्तनाने वादाचा प्रसंग टळला. (प्रतिनिधी)
निवडणुकीच्या रणधुमाळीत जातीय सलोख्याचे दर्शन
By admin | Updated: April 6, 2015 04:20 IST