शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर निदर्शनं

By admin | Updated: April 14, 2017 13:12 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, मोदींचा ताफा दीक्षाभूमीतून निघाल्यावर घोषणा

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. मोदी यांनी दीक्षाभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी कोराडी येथे जात असताना पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी निदर्शनं केली.
 
शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्यासमोर ही निदर्शनं करण्यात आली.  यावेळी "अब ना चलेगा कोई बहाना, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे" या घोषणांनी दीक्षाभूमीचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी नारेबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  या आंदोलनात विदर्भ राज्य आघाडीचे सुरेश लोलणो, शैलेंद्र हारोडे, संदीप सावरकर, अॅड.संजय नेरकर, राजीव तेलंग व फहीम अंसारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.  
 
(पंतप्रधान मोदींचे दीक्षाभूमीवर महामानवाला अभिवादन)
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं.  शिवाय, तेथील गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवलेही होते. 
 
महानिर्मितीच्या कोराडी येथील तीन संचाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी पारडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात वीज संचाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कोराडी वीज प्रकल्पाची पाहणी करीत महानिर्मितीच्या कार्याचे कौतुक केले.
 
कोराडी येथील तीन संच १४ हजार ८०० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये १७० मीटर उंचीचे तीन कुलिंग टॉवर असून चिमणीची उंची २७५ मीटर आहे. प्रकल्पाला ९.१ मिलियन मेट्रिक टन कोळसा आणि ६४ दलघमी पाणी प्रत्येक युनिटला लागणार आहे. यातीलन ४९.५ दलघमी पाणी नागपूर महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून घेण्याच्या उपक्रमाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. 
 
चंद्रपुरातील दोन वीज संचावर ७००४ कोटी खर्च करण्यात आले असून १६७ हेक्टर जागेत ते उभारण्यात आले आहे. परळीतील संचावर २०८१ कोटी रुपये खर्च करण्यात येऊन तो १३० हेक्टर जागेमध्ये आहे. 
कोराडी येथील तिन्ही संच हे जपानच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील पहिले विद्युत संच आहे, हे विशेष! त्यामुळे उत्पादन खर्चात आणि त्यासोबतच प्रदूषणातही घट होणार आहे.