शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कानउघाडणीनंतर दानवेंची दिलगिरी

By admin | Updated: May 12, 2017 03:40 IST

‘तूर खरेदी केली तरी रडतात साले’ या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘तूर खरेदी केली तरी रडतात साले’ या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दानवे यांनी आज त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तो (‘साले’) शब्द आपण शेतकऱ्यांना उद्देशून म्हटलेला नव्हता, असा खुलासाही त्यांनी केला. दानवेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्यभरात उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचेही कार्यकर्ते दानवेंच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले.सूत्रांनी सांगितले की, दानवेंचे वक्तव्य देशभरातील वृत्तपत्रे आणि चॅनेल्सनी ते दाखविल्यानंतर त्याची गंभीर दखल भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी घेतली आणि दानवेंना दिलगिरीचे पत्रक काढण्यास सांगण्यात आले. दानवेंनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून खुलासा केला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनीही त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याची सूचना केली. त्यानंतर दुपारीच त्यांचा ‘दिलगिरीनामा’ जारी करण्यात आला. या दिलगिरीनाम्यात दानवे यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जालना येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांशी संवाद साधणे व तो शेतात जाऊन साधणे, अशा प्रकारची चर्चा झाली. परंतु एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि केंद्र सरकारने पुन्हा एक लाख टन तुर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. अशामध्ये माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. यामध्ये मी शेतक-यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. मी स्वत: शेतक-याच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतक-यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतक-यांची बाजू घेत सतत ३५ वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतक-यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतक-यांशी जोडू नये. परंतु यावरही शेतक-यांची मनं दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे दानवे यांनी म्हटले आहे.

दानवेच राहू द्या - पवाररावसाहेब दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राहणे हे विरोधकांच्या फायद्याचे आहे. उगाच त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता? असा मार्मिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लगावला.