शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

मोदी सरकारकडून लोकशाही पायदळी

By admin | Published: July 15, 2016 3:43 AM

सत्तेच्या लालसेपोटी मोदी सरकारने अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकारे बरखास्त करून लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली असून, राज्यघटनेचा घोर अवमान केला आहे

नांदेड : सत्तेच्या लालसेपोटी मोदी सरकारने अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकारे बरखास्त करून लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली असून, राज्यघटनेचा घोर अवमान केला आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा खा़सोनिया गांधी यांनी गुरुवारी केंद्र सरकारचा समाचार घेतला़ दिवंगत काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच स्मृतिसंग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग होते़ राज्यपालांचे सर्व निर्णय रद्द करत, सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेशात पुन्हा काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा आदेश कालच दिला होता. त्याचा उल्लेख करत सोनिया म्हणाल्या, ‘शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी आजवर नेहमीच संवैधानिक मूल्यांची जपवणूक केली. लोकमताचा आदर करीत सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी आयुष्य वेचले़ मात्र, आज सत्ता मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे उत्तराखंड, अरुणाचलमध्ये पाडली गेली़ मात्र, आपणा सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचा अभिमान वाटला पाहिजे़ कारण न्यायालयाने घटनेचे संरक्षण केले अन् पुन्हा लोकशाही बहाल केली़ या वेळी माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांनी शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करून केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली देशसेवा सदैव स्मरणात राहील़, असे सांगितले.यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माजीमंत्री पतंगराव कदम, दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, आ़भाई जगताप यांचीही समयोचित भाषणे झाली़ प्रारंभी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्त्यांसह प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.शिस्तप्रिय हेडमास्तरशंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करून सोनिया म्हणाल्या, संवैधानिक व्यवस्थेवर त्यांचा कायम विश्वास होता़ ते कधीही संवैधानिक मुल्यांच्या बाहेर जावून काम करण्याचा विचारही करू शकत नव्हते़ शिस्तीबद्दल तर त्यांना हेडमास्तर म्हटले जायचे़ कुठल्याही कामाची सुरुवात केली की ते यशस्वीपणे शेवटपर्यंत नेण्याचा त्यांचा ध्यास असे़ त्यामुळेच ते इंदिरा गांधींचे विश्वासपात्र राहिले़ ज्यावेळी राजीव गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले, त्यावेळी आसाम, मिझोराम, पंजाबमध्ये कडवी आव्हाने होती़ त्यावेळी चव्हाण यांनी देशात शांतता बहाल करण्यासाठी मोठे योगदान दिले़, असेही त्या म्हणाल्या.उद्योगपतींचे कर्ज माफ, शेतकरी मात्र वाऱ्यावरकेंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजपा सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण करून द्यावी लागते़, दुष्काळाबद्दल बोलावे लागते़ तत्कालीन यूपीए सरकारमध्ये शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या, त्या आज कमजोर केल्या जात आहेत़ सहकारी बँका, सहकार क्षेत्रच मोडीत काढले जात आहे, ज्यामुळे लाखो गरजू लोकांना नुकसान सहन करावे लागत आहे़सरकारला जाब विचारूएकीकडे उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जात आहे अन् शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे, ज्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत़ काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही़ सरकारला वेळोवेळी जाब विचारू, असा इशाराही सोनिया यांनी दिला.