शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

थेट निवड लोकशाहीस पोषकच !

By admin | Updated: October 27, 2016 01:58 IST

थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष निवडीचे राज्य सरकारचे धोरण लोकशाहीस पोषक असल्याचे मत नोंदवत, उच्च न्यायालयाने या निवडणुकीसंदर्भात शासनाने जारी

मुंबई : थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष निवडीचे राज्य सरकारचे धोरण लोकशाहीस पोषक असल्याचे मत नोंदवत, उच्च न्यायालयाने या निवडणुकीसंदर्भात शासनाने जारी केलेल्या अध्यादेशावर स्थगिती देण्यास नकार दिला.नगराध्यक्षपदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करून, नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांना करण्याचा अधिकार दिला. यासंदर्भात राज्य सरकारने १९ मे २०१६ रोजी जारी केलेल्या अध्यादेशाला इचलकरंजीच्या काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणारी याचिकाही, इचलकरंजीच्या राजेंद्र पाटील व अन्य काही जणांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्याद्वारे न्यायालयात केली. या याचिकांवरी सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोमक यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारचा निर्णय लोकशाहीस पोषक असून, याद्वारे घोडेबाजारास आळा बसेल, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारने मेमध्ये काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुका याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यात येतील, असा आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली, परंतु उच्च न्यायालयाने तसेही करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)