शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांची लाच मागताना उपसरपंचाला अटक

By admin | Updated: August 31, 2016 18:23 IST

तालुक्यातील शिरजगाव देशमुख गट ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम तोताराम वानखडे यास २ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक

ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. ३१ - तालुक्यातील शिरजगाव देशमुख गट ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम तोताराम वानखडे यास २ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली.  
शहरातील विजयराज नरेंद्र देशमुख रा.शिवाजी वेस यांचे शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत विजयलक्ष्मी हॉटेल अ‍ॅन्ड लॉजींग आहे.  या हॉटेल अ‍ॅन्ड लॉजींग समोरील जागेत पार्कींगकरीता टिनशेड उभारण्याकरीता त्यांनी ग्रामपंचायतकडे परवानगी मागितली असता बळीराम वानखडे, उपसरपंच ग्रा.पं. शिरसगाव देशमुख यांनी  दोन लाख रुपये लाचेची मागणी त्यांचेकडे केली होती. याबाबतची तक्रार विजयराज नरेंद्र देशमुख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा येथे  नोंदविली होती.
या  तक्रारीवरून २५ जुलै २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता त्यावेळी  उपसरपंच बळीराम वानखडे यांनी विजयलक्ष्मी हॉटेल अ‍ॅन्ड लॉजींग समोर पार्कींगकरिता टिनशेड उभारण्याची परवानगी देण्यासाठी तडजोडीअंती पहिला हप्ता ७५ हजार रूपये लाचेची स्पष्ट मागणी केली होती. त्यानंतर  २६ जुलै २०१६ रोजी पैसे स्विकारण्याचे ठरले होते. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कार्यवाही आयोजित केली असता, सापळा कार्यवाही दरम्यान बळीराम वानखडे  उपसरपंच यांना तक्रारदारावर काहीतरी संशय आल्याने त्यांनी त्यांचेकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही व लाच न स्विकारता लगेच निघून गेले. त्यामुळे त्यांचेविरूध्द कलम ७, १५ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे लाच मागणीबाबत गुन्हा नोंद करण्यात येवून अटक करण्यात आली आहे.
ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक महेश चिमटे,  अप्पर पोलिस अधीक्षक विलास देशमुख यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विलास पाटील, पोनि एस.बी. भाईक, एएसआय शाम भांगे, सुभाष शेकोकार, पोना संजय शेळके, प्रदीप गडाख, पोकाँ विजय वारूळे, निलेश सोळंके, चालक पोहेकाँ रविंद्र लवंगे यांनी केली.