शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बाजीराव व लालबागच्या राजाला यंदा मागणी

By admin | Updated: August 27, 2016 03:24 IST

या वर्षी बाजीराव आणि लालबागच्या राज्याच्या गणेशमुर्तींना अधिक मागणी असून मूर्तींच्या किंमतीत १५ टक्के वाढ झाली आहे.

वाडा : या वर्षी बाजीराव आणि लालबागच्या राज्याच्या गणेशमुर्तींना अधिक मागणी असून मूर्तींच्या किंमतीत १५ टक्के वाढ झाली आहे. अशी माहिती येथील कुंभार आळीतल्या गणेश आर्ट मूर्तीशाळेचे मूर्तिकार आशिष साळवी यांनी दिली. विशेष म्हणजे त्यांनी जे.जे.मधून शिल्पकलेची पदवी घेतली आहे. मूर्तीची सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीव काम, डोळ्यांची सजीवता आणि आकर्षक व रूबाबदार नैसर्गिक रंगकाम यामुळे त्यांनी स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या गणेशमूर्तींना मुंबई सह पालघर व ठाणे जिल्ह्यात भरपूर मागणी आहे.गेल्या १२ वर्षापर्वी आशिष यांचा भाऊ सुशील यांनी सुरू केलेला हा कारखाना भव्य स्वरूपात आहे. मोजक्याच आॅर्डर घेऊन ते मूर्ती बनवत आहेत. सुशील हा ही निष्णात मूर्तीकार असून त्याने उलवा (पनवेल) येथे प्रशिक्षण घेतले असून या बंधूंनी या व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे. गणपती, गौरी मातेच्या घरगुती व सार्वजनिक मूर्ती येथे बनविल्या जातात. आपल्या कारखान्यात ६५० मूर्ती तयार असल्याचे त्यांनी सांगितले. या मूर्त्या शाडू तसेच प्लास्टर आॅफ पॅरिस पासून घडवल्या जातात. या व्यवसायात दोघे बंधू व आणखी दहा कामगार पाच महिने हा धंदा करतात. असे आशिष याने सांगितले. यावर्षी बाजीराव मस्तानी व लालबागचा राजा या मूर्तीना अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरगुती गणेशमूर्ती मध्ये विविध नक्षीकाम असलेल्या विशेषत: रंगबेरंगी खड्यांचे नक्षीकाम असलेल्या मूर्तीना अधिक मागणी आहे. एक फुटांपासून पंधरा फूटांपर्यत उंचीच्या या मूर्ती असतात. त्यांची किंमत १ हजारापासून १५ हजारापर्यत आहे. या वर्षी पंधरा टक्क्यांनी भाव वाढले असल्याचे सुशीलने सांगितले. नैसर्गिक रंगकाम हे आमचे खास वैशिष्टयÞ आहे असे ते आर्वजून सांगतात. कुंभार कामाचा आमचा वडिलोपार्जित धंदा असल्याने त्या कामाचा आम्हाला अनुभव आहे. आणि त्यामुळेच आम्ही आता या व्यवसायाकडे वळलो आहोत. शिल्पकार ही पदवी संपादन केल्याने त्याचा फायदा या व्यवसायात आम्हाला होत असल्याचे आशिष याने सांगितले. (वार्ताहर)मुंबई, ठाणे, पालघर येथून मागणीगणेश मूर्तीकारांचे कामाचे तास वाढले असून बाप्पाच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वाडा शहरातील कुंभार आळी येथील श्री गणेश आर्ट या कारखान्याच्या मूर्तीकारांचेही काम अंतिम टप्प्यात असून येथे बनवल्या जाणाऱ्या आकर्षक व रेखीव गणेश मूर्तीना मुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्यÞात दरवर्षी सर्वाधिक मागणी असते. विशेष म्हणजे काही मूर्ती येथून औरंगाबाद येथेही नेल्या जातात.