शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापण्याची मागणी

By admin | Updated: June 28, 2017 03:23 IST

नेवाळीच्या शेतजमिनींचा तिढा सोडवण्यासाठी महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन करावी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या शेतजमिनींचा तिढा सोडवण्यासाठी महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, या मागणीसाठी भाजपच्या खासदार, आमदार आणि नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही समिती शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊ शकेल, असे सुचवणारे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी गावकऱ्यांच्या प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास विरोध केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी २९ जुलैला बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापूर्वी ही बैठक होईल, असे वाटत असतानाच भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून नवे साकडे घातले.खासदार कपील पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आणि कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. नेवाळी आंदोलनप्रकरणी मध्यस्थी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधांना दिले. संरक्षणमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.