शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सबनीसांची डी.लिट.ची मागणी फेटाळली

By admin | Updated: February 3, 2016 01:42 IST

एखाद्याला डी.लिट. ही पदवी सन्मानाने दिली जाते... ती द्यावी अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही; मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ही गोष्ट अपवाद ठरवली.

पुणे : एखाद्याला डी.लिट. ही पदवी सन्मानाने दिली जाते... ती द्यावी अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही; मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ही गोष्ट अपवाद ठरवली. ‘कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने ही पदवी मला देण्याबबात विचार करावा,’ अशी विनंती त्यांनी विद्यापीठाला केली; पण विद्यापीठ जुमानत नाही म्हटल्यावर त्यांनी चक्क न्यायालयात धाव घेतली. इथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. डी.लिट. ही पदवी सन्मानाने देण्यात येत असून कायदेशीर अधिकारात ती मागता येत नाही, असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. सबनीस यांची याचिका नुकतीच फेटाळली. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी २००३मध्ये शिवाजी विद्यापीठाकडे डी.लिट. पदवी मिळण्यासाठी अर्ज केला होता. ‘साहित्य क्षेत्रातील माझे योगदान, पुस्तके, अध्यापन कार्य यांची दखल घेऊन डी.लिट. पदवीसाठी माझा विचार व्हावा,’ असे त्या अर्जात म्हटले होते. याला डॉ. सबनीस यांनीदेखील दुजोरा दिला. या संदर्भात ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवाजी विद्यापीठाकडे डी.लिट.साठी अर्ज केला होता हे मान्य केले; मात्र सन्माननीय म्हणून नव्हे, तर डी.लिट. पदवी मिळण्यासाठी आपण रीतसर परीक्षा दिली होती. या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिवांकडे वारंवार विचारणा केली. त्यांनी पास किंवा नापास काहीच सांगितले नाही. थोडक्यात, कोणतेच उत्तर मिळाले नाही. मग शेवटी न्यायालयात विद्यापीठाविरोधात याचिका दाखल करावी लागली. जो काही मानसिक त्रास यादरम्यान झाला त्याबाबत नुकसानभरपाई मागितली. मात्र, न्यायालयाने तांत्रिक मुद्द्यावरून याचिका फेटाळली असल्याचे माझ्या वकिलांकडून समजले आहे. निकाल वाचल्यानंतरच कोणत्या कारणावरून ती फेटाळली हे कळू शकेल, असे सबनीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)