शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दलित युवकाच्या हत्येची सीआयडी चौकशी व्हावी कवाडेंची मागणी

By admin | Updated: May 6, 2014 22:07 IST

खर्डा येथे नितीन आगे या दलित युवकाची हत्या ही जातीय विद्वेषातून घडली आहे़ हा शांत डोक्याने केलेला खून असून, याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे..

अहमदनगर : खर्डा येथे नितीन आगे या दलित युवकाची हत्या ही जातीय विद्वेषातून घडली आहे़ हा शांत डोक्याने केलेला खून असून, याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी सोमवारी केली़ दरम्यान, राज्य सरकार या घटनेने विषन्न आहे़ आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी योग्य ती पावले उचलू असे आश्वासित करुन काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला पक्षाकडून पाच लाखांची मदत जाहीर केली़पीडित आगे कुटुंबाच्या सांत्वनासाठी सोमवारी सलग आठव्या दिवशी अनेक नेत्यांनी खर्डा गाठले़ दुपारी २ च्या सुमारास कवाडे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळाला भेट देऊन आगे कुटुंबाचे सांत्वन केले़ त्यानंतर ४ वाजेच्या सुमारास माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनीही आगे कुटुंबीयांची भेट घेतली़ यावेळी कुटुंबाशी बोलताना ठाकरे म्हणाले, ही घटना पुरोगामी राज्यासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे़ या घटनेने राज्याचे सामाजिक वातावरण बदलण्याची गरज अधोरेखित केली आहे़ पक्ष व सरकार पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे़ काँगे्रस पक्षाकडून पीडितांना पाच लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली़ यावेळी मयत नितीनचे वडिल राजू आगे यांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली़ राजू आगे म्हणाले, या गावाऐवजी अन्य गावात पुनर्वसन करावे़ त्यानुसार जामखेड येथे या कुटुंबासाठी जागा शोधून पुनर्वसनासाठी सरकार पातळीवर पावले उचलली जातील, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले़ दरम्यान, ठाकरे, थोरात पोहोचले त्याचवेळी शिवसेनेच्या उपनेत्या डॉ़ निलम गोर्‍हे यांनी आगे कुटुंबियांची भेट घेऊन महसूल मंत्र्यांवर टीका केली़ दरम्यान, ज्या परिसरात ही घटना घडली त्या खर्डा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)