शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरितांसाठी श्रमिक ट्रेनची मागणी प्रलंबित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 06:22 IST

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती; गरज भासल्यास व्यवस्था करण्यास तयार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्थलांतरितांसाठी श्रमिक विशेष ट्रेनची मागणी प्रलंबित नाही. तशी गरज भासल्यास ट्रेनची व्यवस्था करू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरितांचे हाल होत असल्याची चिंता व्यक्त करीत सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनच्या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, ज्या स्थलांतरितांनी श्रमिक ट्रेनने किंवा बसने त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी राज्य सरकारकडे अर्ज केला आहे, त्यांना त्यांच्या प्रलंबित अर्जाबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही. त्यांना अस्वच्छ व घाणेरड्या निवासस्थानात अन्न व आवश्यक वस्तूंशिवाय राहावे लागत आहे.या याचिकेवर सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करीत सर्व आरोप फेटाळले. १ जूनपर्यंत ८२२ ट्रेन ११,८७,१५० स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात घेऊन गेल्या, असे नमूद केले. ‘श्रमिक विशेष ट्रेनपैकी एक ट्रेनच बाकी आहे. ही ट्रेन मणिपूरहून सुटेल. याव्यतिरिक्त आणखी विशेष ट्रेन  स्थलांतरितांसाठी सोडण्याची मागणी प्रलंबित नाही,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.अन्य ट्रेन सुरू झाल्याने स्थलांतरित मजूर व अडकलेक्या प्रवाशांना श्रमिक ट्रेनवर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. स्थलांतरितांकडून प्रवासाचे भाडे आकारण्यात येत नाही. हा खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून करण्यात येत आहे, असे सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले.पुढील सुनावणी ९ जूनलाप्रतिज्ञापत्रानुसार, १० एप्रिलपर्यंत ५,४२७ साहाय्यता कॅम्प उभारले. त्यात ६,६६,९९४ स्थलांतरित राहिले. तर ३१ मेपर्यंत या कॅम्पमध्ये ३७,९९४ स्थलांतरितांनी आश्रय घेतला. याचाच अर्थ बहुतांशी अडकलेले स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ राज्यात परतले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ९ जून रोजी ठेवली आहे.