शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘घोडावत’च्या फुलांना जगभरातून मागणी

By admin | Updated: February 10, 2017 21:26 IST

‘व्हॅलेंटाईन डे’ : तीस लाख गुलाब निर्यात होणार

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील घोडावत अ‍ॅग्रोच्या ग्रीन हाऊसमधून यावर्षी २५ ते ३० लाख फुले ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने देश-विदेशात जाणार आहेत. घोडावत उद्योग समूहाच्या स्टार ग्रीन हाऊसने उत्पादित केलेली आकर्षक गुलाब फुले देश व विदेशातील गुलाबप्रेमींना भुरळ घालणार आहेत. फुलांच्या निर्यातीतून परकीय चलन महाराष्ट्राला मिळणार आहे, अशी माहिती घोडावत अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक अनिल कोटेचा यांनी दिली.संजय घोडावत, नीता घोडावत यांचे मार्गदर्शन व श्रेणिक घोडावत यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाब फुले देश व विदेशातील बाजारपेठेत पाठविली जाणार आहेत. त्यामध्ये परकीय बाजारपेठेमध्ये जपान, यु. के., ग्रीस, दुबई, हॉलंड, आदींचा समावेश आहे. तसेच देशांतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, विजयवाडा, इंदौर तसेच गोवा या मोठ्या शहरांतील बाजारपेठांचा समावेश आहे. घोडावत अ‍ॅग्रोच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असल्याने यापैकी सुमारे १४ ते १५ लाख लाल गुलाब फुले उर्वरित इतर रंगाची फुले देश-विदेशात बाजारपेठेत पाठविली जाणार आहे. जागतिक दर्जाचे स्वयंचलित तंत्रज्ञान, कुशल व अनुभवी कर्मचारी आणि कामगार, गरजेनुसार आवश्यक असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करणे, उत्पादन दरम्यान व उत्पादन पश्चात कार्यशिलता, नेटके वाहतूक नियोजन या सर्व उत्कृष्ट संयोजनामुळे घोडावत अ‍ॅग्रोने देश-विदेशातील ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे. कृषी औद्योगिक व व्यापार क्षेत्रातील संजय घोडावत यांचा प्रदीर्घ अनुभव या प्रकल्पास लाभला आहे. त्यांच्यासमेवत नीता घोडावत व प्रकल्पाचे कार्यकारी संचालक श्रेणिक घोडावत यांच्या अभ्यासूवृत्तीने केलेले नियोजन व कामगारांचे लाभलेले सहकार्य या सर्वांच्या सांघिक सहकार्यामुळे घोडावत अ‍ॅग्रोच्या उत्पादनाला वाढती मागणी असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)