शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी

By admin | Updated: December 29, 2016 01:33 IST

प्रेमप्रकरणानंतर लग्नास नकार देणा-या प्रियकरावर थेट बलात्काराचा आरोप आणि गुन्हा नोंदविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. अशा प्रकरणात गुन्हा नोंदविण्याबाबत मार्गदर्शक

मुंबई : प्रेमप्रकरणानंतर लग्नास नकार देणा-या प्रियकरावर थेट बलात्काराचा आरोप आणि गुन्हा नोंदविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. अशा प्रकरणात गुन्हा नोंदविण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी राज्य सरकार आणि पोलिसांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका प्रेमी युगुलानेच ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेतील मुलीने विवाहास नकार दिला म्हणून मुलाविरुद्ध बलात्काराचा आरोप केला होता. पोलिसांनी तसा गुन्हाही नोंदविला. मात्र, हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचल्यानंतर मुलीने बलात्काराचा आरोप मागे घेतल्याने न्यायालयानेही मुलावरील गुन्हा रद्द केला. मुलीच्या म्हणण्यानुसार , पोलिसांनी यासंदर्भात मुलावर चुकीचा आरोप ठेवला असून पोलिसांनी मराठीत जबाब नोंदविल्याने तिला यातील काहीच कळले नाही. अ‍ॅड, महेश वासवानी यांनी त्याबाबत बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने एफआरआर रद्द करण्याचा आदेश दिला होता.त्यामुळे यापुढे प्रेमप्रकरणातून उद्भवणारे गुन्हे नोंदविताने ते पीडीतेला समजेल अशा भाषेत जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच अशा तक्रारींची दखल घेण्यासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे आखावीत. जेणेकरुन कायद्याचा गैरवापर करुन एखाद्या मुलावर बलात्कारासारखा गंभीर नोंदला जाणार नाही. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजीत जबाब नोंदविण्याची परवानगी द्यावी तसेच प्रेमप्रकरणातील गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आखण्याबाबत राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. अ‍ॅड. महेश वासवानी यांच्यासह अ‍ॅड. स्वप्ना कोडे, अ‍ॅड. धारिणी नागदा, अ‍ॅड.मानसी महांता आणि अ‍ॅड. अमला साळवी यांनी याबाबत याचिकाकर्तीची बाजू मांडली. (प्रतिनिधी)